हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Tips : जगभरात सध्या आर्थिक मंदीचे वातावरण आहे. ज्यामुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम होतो आहे. यामुळे भारतीय शेअर बाजार देखील अस्थिर झाला आहे. गेले काही दिवस भारतीय बाजारात प्रचंड चढ-उतार दिसून आले आहेत. मात्र असे असूनही असे काही शेअर्स आहेत जे येत्या एक-दोन महिन्यांत 20% पर्यंत रिटर्न देऊ शकतात. अॅक्सिस सिक्युरिटीजच्या मते, काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीयरित्या ब्रेकआउट दिसून आले आहे. ज्यामुळे भविष्यात त्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…
सध्या टाटा केमिकल्स लिमिटेडच्या शेअर्स 1,163 रुपयांच्या जवळ आहेत. विकली टाइमफ्रेमवर या शेअर्सने 1160 ची रेझिस्टन्सची पातळी ओलांडली आहे. ही वाढ लक्षणीय प्रमाणात झाल्याचे दिसून येते आहे. ज्यामुळे लवकरच हे शेअर्स 1315 ते 1365 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. Stock Tips
मिश्रा धातू निगम लिमिटेडचे शेअर्स सध्या 229 रुपयांच्या जवळ आहेत. तसेच विकली चार्टवर यामध्ये 230-148 च्या पातळीवर कंसोलिडेशन पाहिले गेले आहे. तसेच याचा डेली आणि वीकली स्ट्रेंथ इंडिकेटर बुलिश मोड मध्ये दिसत आहे. ज्यामुळे लवकरच हे शेअर्स 260 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. Stock Tips
सन टीव्ही नेटवर्कचे शेअर्स सध्या 530 रुपयांवर ट्रेड करत आहेत. तसेच वीकली टाइम फ्रेमवर त्यामध्ये तेजीचा कल दिसून येतो आहे. मात्र डेली टाइम फ्रेमवर ते सतत वर आणि खाली होत आहेत. मात्र, त्याचा वीकली स्ट्रेंथ इंडिकेटर बुलिश असल्याचे दिसून येते. ज्यामुळे लवकरच हे शेअर्स 590 ते 613 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. Stock Tips
महिंद्रा CIE ऑटोमोटिव्ह लिमिटेडचे शेअर्स सध्या 306 रुपयांवर आहेत. आजच्या ट्रेडिंगमध्ये या शेअर्समध्ये सुमारे 4.25 टक्क्यांनी घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. मात्र वीकली टाइमफ्रेमवर या शेअर्सने 300 ची रेझिस्टन्सची पातळी ओलांडली आहे. तसेच याचा डेली आणि वीकली स्ट्रेंथ इंडिकेटर बुलिश मोडमध्ये दिसत आहे. ज्यामुळे लवकरच ते 343 ते 362 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. Stock Tips
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.tatachemicals.com/
हे पण वाचा :
Bank FD : ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक FD वर देत आहेत 8.25% व्याज, त्यासाठीच्या अटी जाणून घ्या
Multibagger Stock : घसरत्या बाजारातही ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 18 पट रिटर्न !!!
Gold Investment : फिजिकल की डिजिटल यांपैकी कोणत्या गोल्डमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल ते पहा
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 150 हून जास्त गाड्या रद्द !!! रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Bank FD : ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक FD वर देत आहेत 8.25% व्याज, त्यासाठीच्या अटी जाणून घ्या