सांगली प्रतिनिधी | मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये परिक्षाचा ताण असतो एकदाच काय परीक्षा झाल्या की विध्यार्थ्यांना सुट्यांची पर्वणी मिळते. मागील काही काळामध्ये विध्यार्थ्यांना सुट्टी म्हणजे पारंपरिक खेळ, निसर्गाची माहिती या संबंधी पालकांकडून मार्गदर्शन केले जात होते. मात्र सध्या मोबाईलचा जमाना मध्ये मोबाईल गेम्स मध्ये गुरफटलेले असतात. परिणामी विध्यार्थ्यांना नैसर्गिक साधनसंपत्तीची माहिती मिळत नाही. तसेच मैदानी खेळ लोप पावत चालली आहे.
यामुळे सांगलीतील स्वयंसिद्ध डान्स स्टुडिओ केअर फौंडेशन तर्फे टिपिटीपी टॉप टॉप मज्जा आभाळभर या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. उन्हाळी सुट्ट्या या उपक्रमा अंतर्गत बाळगोपाळांना पाळाना, हॉर्स रायडिंग, राफायल शूटिंग , स्विमिंग, डान्स, हॉट क्रॉप्स या शिवाय नैसर्गिक साधनसंपत्तीची माहिती होण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पती उद्यान मध्ये जाऊन वनस्पतीची माहिती विध्यार्थ्यांना देण्यात येत आहे.
यामध्ये तज्ज्ञ प्राध्यापक सोबत नावाजलेले गेस्ट लेक्चर यांच्यासह मुलांना मोबाईल गेम्स पासून दूर करण्यासाठी समुउपदेशकांचे विशेष मार्गदर्शन यावेळी मुलांना देण्यात येत आहे आज सांगलीतील आमराई मध्ये या उपक्रमा अंतर्गत येथे असणाऱ्या दुर्मिळ वृक्षा संबधी माहिती देण्यात आले तसेच कचऱ्या पासून कंपोस्ट खत कसे बनते याचे मार्गदर्शन देण्यात आली. बालचमूंनीही या शिबिरामध्ये सहभागी होत उत्स्फूर्तपणे माहिती घेतली.