सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
सर्व सेवकांच्या बदल्या सोईने व विनंती अर्जाने कराव्यात. तसेच ऑनलाईन बदली धोरणामधील सर्व त्रुटी दूर होईपर्यंत अन्यायकारक ऑनलाईन बदली प्रक्रिया थांबविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, यावेळी आर. डी. गायकवाड यांनी सर्व सेवकांना आश्वासन दिले.
साताऱ्यात रयत सेवकांचा मेळावा पार पडला. रयत शिक्षण संस्थेच्या बदली धोरणाबाबत गेली दोन महिने रयत सेवक संघाने अन्यायकारक बदली प्रक्रियेला विरोध दर्शविला आहे. मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देवून सकारात्मक चर्चा झालेली आहे त्यातील काही प्रश्न सोडविण्यात यश आलेले आहे. १ मेला होणाऱ्या बदल्या आजपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात यशस्वी झाले आहोत. परंतु, आपणास 100% यश मिळण्यासाठी सतत सचिव तसेच सर्व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून महिला भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन सर्व सेवक याचे प्रश्न मार्गी लागणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी रयत सेवक संघ सेवकांच्या पाठीशी उभा राहून प्रश्न सोडविणार याचा सर्व रयत सेवकांना विश्वास आहे. यासंबंधी प्रांतिक अध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी शिवाजीराव भोर, महाराष्ट्र राज्य सचिव अनिल खरात, त्याचबरोबर वडजे बापू, चंद्रकांत जाधव, उमेश देशमुख, राव मोहिते, गुलाबराव खाडे, साहेबराव पवार, गणपतराव तावरे, अविनाश पवार, प्राचार्य दत्तात्रय पांढरे, अविनाश पवार, अजय दिघे, विजय चव्हाण तसेच सर्व रयत सेवक संघाचे सर्व पदाधिकारी सभासद बंधू-भगिनी सर्व रयत सेवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साताऱ्यात रयत सेवकांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील रयत सेवक मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित होते.