Wednesday, October 5, 2022

Buy now

LPG Price : व्यावसायिक गॅस सिलेंडर 136 रुपयांनी स्वस्त !!! घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG Price  : सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून बुधवारी सकाळी एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाहीर झाले. आज कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 135 रुपयांनी कपात केली आहे.

पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने एलपीजी सिलेंडरच्या दरात ही कपात केली आहे. यामुळे आता इंडेन गॅसचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त होणार आहे. मात्र इथे लक्षात घ्या कि, 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या 19 मे रोजी जारी केलेल्या दरानेच घरगुती सिलेंडर विकले जात आहे. LPG Price

LPG Cylinder Price News Today: Non-Subsidised LPG Price Cut By More Than Rs  50 Per Cylinder In Metros

आज 1 जूनपासून व्यावसायिक सिलेंडरचे नवे दर जाहीर झाले. आता दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी 2,219 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे, कोलकातामध्ये तो 2,322 रुपयांना मिळेल. मुंबईतही त्याची किंमत 2,306 रुपयांवरून 2,171.50 रुपयांवर आली आहे तर चेन्नईमध्ये सिलेंडर 2,373 रुपयांना विकला जाईल.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही, मात्र मे महिन्यातच त्याच्या किमती दुपटीने वाढल्या. 7 मे रोजी पहिल्यांदा कंपन्यांनी 14.2 किलोच्या सिलेंडरवर 50 रुपयांची वाढ केली आणि त्यानंतर 19 मे रोजी 3.50 रुपयांनी वाढ केली, त्यानंतर दिल्ली-मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरच्या किमती एक हजार रुपयांच्या वर पोहोचल्या. 7 मे रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडर 10 रुपयांनी स्वस्त झाला होता, तर 19 मे रोजी त्याच्या किमतीत 8 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. LPG Price

Book LPG Cylinders On Amazon Pay, Avail Rs 50 Cashback - odishabytes

सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज राजधानी दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत सर्वात मोठी कपात केली आहे. येथे 19 किलोचा एलपीजी सिलेंडर आज 136 रुपयांनी स्वस्त झाला आहे, तर कोलकात्यात तो 133 रुपयांनी कमी झाला. याशिवाय, मुंबईत 135.50 रुपयांनी तर चेन्नईमध्ये 135 रुपयांनी कमी झाली आहे. LPG Price

Non-subsidised cooking gas price cut by a record Rs 162.50 per cylinder |  Business News | English Manorama

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/lpg-price.html

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीचे भाव घसरले, आजचे नवीन दर पहा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी प्र – कुलगुरूपदी प्रा.डॉ.संजीव सोनवणे

पेट्रोल- डिझेल संपल्याने शिवशाहीचा बसेस खोळंबा : प्रवाशांचे हाल

फडणवीसांच्या मनातील सूर्याला आम्ही भीक घालत नाही : दिपाली सय्यद

Investment Tips : वयाच्या 40 नंतर भविष्यासाठी गुंतवणूक कशी करावी हे समजून घ्या