‘या’ कंपनीचे कफ सिरप धोकादायक, WHO कडून मेडिकल अलर्ट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतातील मेडेन फार्मास्युटिकल्स या कंपनीने बनवलेल्या खोकला आणि सर्दीवरील सिरपबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून म्हणजेच WHO कडून एक मेडिकल अलर्ट जारी करण्यात आले आहे. द गॅम्बियामध्ये झालेल्या 66 मुलांच्या मृत्यूनंतर हा अलर्ट जारी करण्यात आला. यानंतर WHO ने या औषधाची चाचणी केली असता मेडेन फार्मास्युटिकल्सच्या खोकला आणि सर्दी सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची मोठ्या प्रमाणात मात्रा आढळून आली. ज्यामुळे लोकांना याचा त्रास झाला.

चार उत्पादनांचे नमुने तपासण्यात आले
ज्या चार उत्पादनांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली त्यात मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड ऑफ इंडियाने बनवलेले खोकला आणि कोल्ड सिरपचा समावेश आहे. यानंतर आरोग्य संघटनेने रुग्णांना अधिक त्रास होऊ नये म्हणून सर्व देशांमध्ये अशी उत्पादने शोधून काढून टाकण्याची शिफारस केली आहे. हे सिरप प्यायल्यामुळे या 66 मुलांना आपला जीव गमवावा लागला अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे WHO महासंचालक टेड्रोस अ‍ॅधानोम गेब्रेयसस यांनी दिली आहे.

औषधातील या विषारी घटकामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, मूत्रमार्गात अडथळा, डोकेदुखी, मेंदू आणि किडनीवर परिणाम होतो. संबंधित देशाच्या अधिकार्‍यांकडून पूर्ण चौकशी होईपर्यंत या औषधांचा वापर करू नये, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO)सांगण्यात आले आहे. यामुळे इतर जीवघेणे आजार होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!