कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पुणे- बंगळूर महामार्गावर इंदोली फाटा येथे नविन ब्रिज जवळ आज सकाळी सातारा ते कराड लेनवरती आयशर चालकाचा ओव्हरटेक करण्याच्या नादात गाडीवरील ताबा सुटल्याने पुढे चालेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत आयशर गाडी रस्त्यावर जागेवरच फीरली असता त्याच्या मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने आयशरला जोरात धडक दिली. त्या पाठोपाठ चारचाकी कारने मोहन ट्रॅव्हल्सला धडक दिली. या विचित्र अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा – कराड या दरम्यान इंदोली फाटा येथे सकाळी 10 वाजता चार वाहनांचा अपघात झाला. या अपघातात आयशर क्रमांक (एमएच-112- पीक्यू- 1067), ट्रव्हल्स क्रमांक (एमएच- 08- एपी- 8800) आणि चारचाकी (एमएच- 12- बीवाय- 8018) व अन्य एक टेम्पो अशा चार वाहनांचा अपघात झाला. यामध्ये ओंकार संजय मांजरेकर (वय 28, रा. कोल्हापूर) व आयशर चालक शंतनू घाटे (वय – 38) अशी जखमींची नावे आहेत.
जखमींना कराड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होवून जखमींना रुग्णालयात पाठवून दिले जीरबी हायवे पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, समीर केंजळे, प्रकाश गायकवाड तसेच उब्रंज पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी मदत करुन अपघाताची वहाने बाजूला काढली.