सावधान! रेल्वेत सिगारेट ओढत असाल तर पडेल महागात; तब्बल इतक्या प्रवाशांवर कठोर कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रेल्वेमध्ये आणि रेल्वे परिसरात सिगारेट ओढणाऱ्या आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींवर मध्य रेल्वेकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यात मध्य रेल्वेने 1150 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 4.96 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे आता इथून पुढे देखील रेल्वेमध्ये किंवा रेल्वे परिसरात सिगारेट ओढताना किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

धूम्रपान करणे हे आरोग्यासाठी हानिकारक असते हे आजवर आपण ऐकत आलो आहोतच. परंतु तरीदेखील सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रवास करताना अनेकजण सिगारेट ओढतात तसेच तंबाखूचे सेवन करतात. एवढेच करून न थांबता तंबाखू खाणारे व्यक्ती रेल्वेतील डब्यांमध्ये थुंकतात. त्यामुळे अशा प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. याच कारवाईच्या अंतर्गत गेल्या आठ महिन्यांमध्ये मध्य रेल्वेने 1150 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 4.96 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने भारतीय रेल्वे कायदा कलम 145 अंतर्गत सिगारेट व इतर तंबाखूजन्य 1150 प्रकरणे नोंदवली आहेत. यात 4.96 लाख जणांकडून दंड वसूल केला आहे. एकट्या नोव्हेंबर महिन्यात सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा-२००३ अंतर्गत गुन्ह्यांची 84 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत 16 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.