कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाचपेक्षा जास्त ग्राहक दुकानात परवानगी नाही. शहरात काही पथके तयार केली आहेत. काही ठिकाणी दुकानात नियमांचे उल्लघंन केले आहे. अशा दुकानावरती तीन हजार रूपये दंड व सात दिवस दुकान बंदची कारवाई करण्यात आली आहे. यापुढे नियमांचे उल्लघंन करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कराड शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/468709791209773
कराड येथील चार दुकानांवरती कोरोना नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. शहरातील चंदूकाका सराफ, लक्ष्मी विष्णू क्लाथ, एम. आर. ओसवाल, सुभाष वाडीलाल, बाॅम्बे रेस्टारंट, रूपसंघवी, ट्रेन्झ कलेक्शन, सागर फास्टफुड आणि दाबेली सेंटर व पावभाजी या दुकानांवर रोख रक्कम व सात दिवस बंदची कारवाई करण्यात आली आहे.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/459967931918652
जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी कराड शहरात हाॅटेल्स तसेच मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. शनिवारी बैठक झाल्यानंतर पोलिसांनी बाजारपेठेत फिरून गर्दीच्या ठिकाणावर कारवाई केली आहे. तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी रमाकांत डांगे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील, उपनिरीक्षक राहूल वरोटे याच्यासह कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा