राज्यात कडक संचारबंदी : काय सुरु अन् काय बंद राहणार? जाणुन घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उद्या 14 तारखेपासून उद्या रात्री 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू होईल. यामध्ये ब्रेक द चेन कशी असेल, सार्वजनिक वाहतुकीत काय सुरू राहील, अत्यावश्यक सेवांमध्ये कोण- कोणते घटक असणार तर काही नियम पाळून काय- काय सुरू राहील याविषयी सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. राज्यात केवळ पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीमुळे तिथे निवडणुकीनंतर निर्बंध लागू होतील. सकाळी 7 ते रात्री 8 अत्याआवश्यक सेवा सुरू राहतील. 

Breaking News | राज्यात पुन्हा संचारबंदी जाहीर; मुख्यमंत्री ठाकरेंचा मोठा निर्णय, पहा लाईव्ह अपडेट्स

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1137206120025947

ब्रेक द चेनमधील महत्वाचे घटक खालीलप्रमाणे

15 दिवस राज्यात संचारबंदी राहील, तातडीच्या कामाशिवाय बाहेर फिरण्यास निर्बंध, सार्वजनिक वाहतूक केवळ अत्यावश्यक सेवेसाठी व कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहील, बांधकाम साईटवर मजुरांच्या राहण्याची व्यवस्था करावी लागेल किंवा स्वतंत्र वाहनाने ये- जा करावी लागेल. बस आणि लोकलसेवा सुरू राहणार आहे.

Big News : कोविड रुग्णांसाठी हवाई मार्गाने ऑक्सिजन पुरवठा करा; मुख्यमंत्री ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी

शासकीय योजनांतील 35 लाख लाभार्थ्यांना प्रत्येकी १ हजार रूपये अनुदान मिळणार, १२ लाख परवानाधारक रिक्षाचालकांना १ हजार ५०० रूपये अनुदान, खावटी योजनेच्या आदिवासी लाभार्थी कुटुंबांना २ हजार रूपये अनुदान, बांधकाम मजुरांना १ हजार ५०० रूपये, अधिकृत फेरीवाल्यांना  १ हजार ५०० रूपये तर ५ हजार ४०० कोटींची विविध घटकांना मदत मिळणार.

अत्यावश्यक सेवांमधील घटक खालीलप्रमाणे

हॉस्पिटलं, डायग्नोस्टिक सेंटर्स, क्लिनिक्स, व्हॅक्सिनेशन, मेडिकल इन्शुरन्स ऑफिस, फार्मसी, फार्मसिटकल कंपन्या, हेल्थ सर्व्हिस, उत्पादन यंत्रणा आणि त्याची वाहतूक करणाऱ्या यंत्रणा. दवाखाने, विमा, औषधं, औषधी सेवा डिलर, लस उत्पादन कारखाने, लस वाहतूक वाहनं, वैद्यकीय कच्चा माल वाहतूक. जनावरांशी संबंधित- कृषीची जनावरं, पाळीव प्राणी, वेअरहाऊसिंग, पावसाळ्याची कामं करण्यासाठीचा कर्मचारी, रिझर्व्ह बँक, सेबी, ईकॉमर्स, अधिस्वीकृती धारक पत्रकार, पेट्रोल पंप, कार्गो सेवा, सुरक्षामंडळं सुरू राहतील.

Breaking News : संचारबंदीसोबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; दुर्बल घटकांच्या मदतीसाठी 5 हजार 476 कोटींचे पॅकेज जाहीर

पावसाळ्याची कामं सुरू राहतील. रिझर्व्ह बँक आणि सेबीप्रमाणित कार्यालयं सुरू असतील. टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित यंत्रणा तसंच मालवाहतूक, पाणीपुरवठा यंत्रणा सुरू राहतील.कृषीक्षेत्राशी निगडीत खतं, बियाणं, उपकरणं, दुरुस्ती सुरू राहील. आयात-निर्यात यंत्रणा. ईकॉमर्स यंत्रणा. डेटा सेंटर्स, क्लाऊड सर्व्हिसेस, आयटी यंत्रणा सुरू राहतील. सरकारी आणि खाजगी सुरक्षायंत्रणा. इलेक्ट्रिक आणि गॅस पुरवठा यंत्रणा. एटीएम, पोस्ट सेवा, बंदरं, परवानाधारक औषधं आणि फार्मा उत्पादनांची वाहतूक करणारी वाहनं.

नियम पाळून खालील घटक सुरू राहतील. 

किराणा, दूध, भाजीपाला दुकानं सुरू राहतील. कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊस खुली असतील. हॉटेल आणि रेस्टॉरंटना पूर्वीचेच निर्बंध लागू असतील. पार्सल किचन सुरू राहतील.

कोणाला काय मिळणार

सात कोटी एक महिना गरिबांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मोफत, शिवभोजन थाळी मोफत 2 महिने, नोंदणीकृत घरेलू कामगार यांना 1200 रुपये साहाय्य.

Leave a Comment