सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहर पोलीस ठाणेच्या हद्दीत चोरी, घरफोडी चोरी, जबरी चोरी अशाप्रकारचे गुन्हे दाखल होते. त्यातील चोरांचा शोध घेवून गुन्ह्यांचा तपास करुन चोरी गेलेले दागिने व रोख रक्कम सातारा शहर पोलीसांनी चोरांकडून हस्तगत केली. न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करून न्यायालयाचे आदेशान्वये 7 लाख रुपयाचे दागिने व 1 लाख 80 हजारांची रोख रक्कम आज दि. 1 मार्च रोजी मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. आपला मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादीच्या चेह-यावरचा आनंद पाहून पोलीसानांही समाधान व्यक्त केले.
सातारा पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेवून मूळ मालकांना त्यांचा मुद्देमाल परत केला. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहाय्यक पोलिस अधीक्षकक आंचल दलाल, पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अजित बोऱ्हाडे म्हणाले, फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर चोरांना ताब्यात घेण्यात आले होते. अनेक लोकांनी आपल्या आयुष्याची पुंजी खर्च करून दागिने केलेले होते. आज त्यांना मिळत असल्याने निश्चित आनंद होत असेल परंतु त्याबरोबर आम्हांलाही या वस्तू व रोख रक्कम परत देताना समाधान वाटत आहे.
सातारा पोलिसांची दमदार कामगिरी
1) सातारा शहर पोलीसांनी 74 बेवारस गाडयाचा कायदेशीर प्रक्रिया अवलंबुन लिलाव करून 2 लाख 40 हजार रुपये शासनाकडे जमा केले ही एक उत्कृष्ट कामगिरी आहे.
2) रस्त्यावर केक कापणे याबाबतही 16 लोकांवर सातारा शहर पोलीसांनी कारवाई केली आहे.
3) तहसिलदार कार्यालय, कोल्हापुर येथे नोकरी लावण्याचे अमिष दाखवून 18 युवकांकडुन 15 लाख रुपये घेवून त्यांची फसवणुक केली होती. त्या प्रकरणी 2 भामटयाना अटक करून कडक कारवाई करून त्या युवकांना न्याय देण्यात आला आहे.
4) गाय सी कॉलेज, सातारा येथे मारामारी करून दहशत पसरविण्याय 11 गुन्हेगारांना अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
5) रविवार पेठ, सातारा येथे पुन्याच्या निवळीमध्ये ढकलुन तरुणास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणान्या सराईत गुंड नितीन सोडमिसे यास अटक करण्यात आली आहे.
6) महाराष्ट्रसह गुजरात राज्यामध्ये ट्रक, टैम्पो इतर चारचाकी वाहनांची थकीत ते मरून घेवून सदर नाहनांची परस्पर विक्री करून फसवणूक करणान्या टोळीचा पर्दाफाश करून दोन भामटयांना अटक करून त्याकडून एकूण 35 वाहने किंमत रुपये 5 कोटी रुपयेची वाहने जप्त
7) पोवई नाका, सातारा येथे दिवसाढवळ्या दरोडा टाकून पडलेला गुन्हा स्था.गु.शा. सातारा यांनी उघड केला त्यातील 3 आरोपीना सातारा शहर पोलीसांनी अटक करून गुन्हयातील चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत केली आहे.