व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

PNB कडून ग्राहकांना जोरदार धक्का !! 15 जानेवारीपासून ‘या’ सेवांसाठीचे शुल्क वाढवले

नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँकेने आपल्या खातेदारांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने आपल्या काही सेवांसाठीचे शुल्क वाढवले ​​आहे. PNB च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन शुल्क 15 जानेवारी 2022 पासून लागू होईल. यामध्ये लॉकरचा चार्ज आणि मिनिमम डिपॉझिट यांचा समावेश आहे

मेट्रो शहरांतील ग्राहकांसाठी खात्यातील तिमाही मिनिमम बॅलन्सचे लिमिट सध्याच्या 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली आहे. बँकेच्या या निर्णयाचा परिणाम नवीन आणि जुन्या ग्राहकांवर होणार आहे.

मिनिमम बॅलन्स नसल्यास किती शुल्क आकारले जाईल ते जाणून घ्या
>> शहरी आणि मेट्रो भागात 10 हजारांपेक्षा कमी बॅलन्स असल्यास 600 रुपये शुल्क लागू होईल. आत्तापर्यंत ती 300 रुपये होती. हे शुल्क तिमाहीसाठी आकारले जाईल.

>> त्याचवेळी, ग्रामीण आणि निमशहरी भागात मिनिमम बॅलन्स न ठेवल्याबद्दलचे शुल्क 200 रुपयांवरून 400 रुपये प्रति तिमाही करण्यात आले आहे. मात्र बँकेने ग्रामीण आणि शहरी भागासाठी मिनिमम बॅलन्स लिमिट एक हजार रुपयेच ठेवली आहे.

लॉकर चार्ज मध्ये बदल

>> XL आकाराचे लॉकर वगळता सर्व क्षेत्रांसाठी आणि सर्व प्रकारच्या लॉकर्ससाठी लॉकर फी वाढवण्यात आली आहे.

>> शहरी आणि मेट्रो भागात लॉकरच्या चार्ज मध्ये 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

>> छोट्या आकाराच्या लॉकरचा चार्ज पूर्वी ग्रामीण भागात एक हजार रुपये होते, जे आता 1,250 रुपये होणार आहे. तर शहरी भागात ते 1,500 रुपयांवरून 2,000 रुपयांपर्यंत वाढले आहे.

>> मध्यम आकाराच्या लॉकरचा चार्ज ग्रामीण भागात 2 हजार रुपयांवरून 2,500 रुपये आणि शहरी भागात 3 हजार रुपयांवरून 3,500 रुपये झाले आहे.

>> मोठ्या लॉकरचा चार्ज ग्रामीण भागात 2,500 रुपयांवरून 3,000 रुपये करण्यात आले आहे. तर शहरी भागात ते 5 हजारांवरून 5,500 रुपयांपर्यंत वाढले.