“छोट्या गाड्यांमध्येही योग्य सुरक्षा व्यवस्था केली पाहिजे, केवळ श्रीमंतांनाच अधिकार नाही” – गडकरी

0
32
Vehicle Parking Rule
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की,”छोट्या कारमध्येही सुरक्षेसाठी पुरेशा प्रमाणात एअरबॅग असाव्यात. सहसा लहान कार कमी उत्पन्न गटातीलमध्यमवर्गीय लोकं खरेदी करतात. गडकरींनी प्रश्न विचारला की,”ऑटो कंपन्या श्रीमंत लोकांनी खरेदी केलेल्या मोठ्या कारमध्येच आठ एअरबॅग का देतात.?”

गडकरी म्हणाले की,”सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ते लहान परवडणाऱ्या कारमध्ये जास्त एअरबॅग घेण्याचे आवाहन करत आहेत.” त्यांचे हे स्टेटमेंट अशा वेळी आले आहे जेव्हा ऑटो इंडस्ट्रीने चिंता व्यक्त केली आहे की, जास्त टॅक्स आणि कठोर सुरक्षा आणि उत्सर्जन नियमांमुळे त्यांचे प्रॉडक्ट्स महाग झाले आहेत.”

“छोट्या मध्यम उत्पन्न गटातील लोकांनी लहान कार खरेदी केल्या आहेत. जर त्यांच्या कारमध्ये एअरबॅग नसतील आणि जर अपघात झाला तर त्यांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून, मी सर्व कार उत्पादकांना आवाहन करतो की, त्यांच्या वाहनांच्या सर्व प्रकारांमध्ये किमान सहा एअरबॅग द्या.”

त्यांनी मान्य केले की,” या अतिरिक्त एअरबॅगमुळे लहान कारची किंमत किमान 3,000 ते 4,000 रुपयांनी वाढेल.” “आपल्या देशातील गरिबांनाही पूर्ण सुरक्षा मिळायला हवी, असे ते म्हणाले.”

स्पष्टपणे मत व्यक्त करणारे गडकरी म्हणाले,” तुम्ही श्रीमंतांसाठी आठ एअरबॅग्ज देता. स्वस्त कारसाठी, आपण फक्त 2-3 एअरबॅग ऑफर करता. असे का?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here