कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्वाचं पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि श्री जोतिबा मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. मुंबई येथील स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टन्स प्रा. लि. या कंपनीने दोन्ही मंदिरांचे स्ट्रक्चरल ऑडिट अगदी नाममात्र मानधनात करून देणार आहे. प्रत्यक्ष कामाला पुढील आठवड्यात सुरुवात होणार असून देवस्थान समितीच्या वतीने कंपनीसोबतचा पत्रव्यवहार पूर्ण केला आहे. 90 दिवसांत दोन्ही मंदिरांचे स्ट्रक्चरल ऑडिट कंपनीने पूर्ण होणार आहे. मंदिर संवर्धनासाठी याचा उपयोग होणार आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबईच्या स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टन्स प्रा. लि. या कंपनीने दोन्ही मंदिरांचे स्ट्रक्चरल ऑडिट अगदी नाममात्र मानधनात करून देण्याची तयारी दाखवली होती. पत्रव्यवहार करून देवस्थान समितीने मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सुरू करण्यास कंपनीला परवाना दिला आहे. अंबाबाई मंदिराचे ड्रॉईंग पूर्ण असल्याने प्रथम अंबाबाई मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिट कामाला सुरुवात होणार आहे. जोतिबा मंदिराचेही ड्रॉईंग पूर्ण करून तेथील कामही सुरू केले जाणार आहे. स्ट्र
क्चरल ऑडिट झाल्यानंतर मंदिर वास्तू संवर्धनास त्याचा लाभ होणार आहे. यामुळे मंदिराची स्थिती, स्थैर्य, टिकावूपणा कसा आहे याचा अंदाज स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर येणार आहे. यानंतर मंदिरावरील खंडित शिल्प सौंदर्याची दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. तसेच मंदिराच्या ज्या शिळा निखळण्याच्या स्थितीत आहेत, त्यांचे संवर्धन करणे शक्य होणार आहे. या दोन्ही मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिट ला पुढील आठवड्यात सुरुवात होणार असून प्रत्येक्ष काम सुरुवात झालेल्या दिवसापासून पुढील 90 दिवसात हे सर्व काम पूर्ण होणार आहे.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
सर्वांना माहित असतं आपला फोन टॅप केला जातो, पण मी त्याला गांभीर्याने घेत नाही – शरद पवार
ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री जाहीर
धक्कादायक ! दीड कोटींच्या विम्यासाठी स्विफ्ट गाडीसह मित्राला जाळलं, साताऱ्यातील घटना