Sunday, April 2, 2023

कोल्हापूर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिला ३१ जानेवारीपर्यंत जिल्हा बंदीचा आदेश

- Advertisement -

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

कोल्हापूर जिल्ह्यात विविध पक्ष,संघटनांनी पुकारलेला बंद तसेच प्रजासत्ताकदिनी विविध मागण्यांसंदर्भात संभाव्य आंदोलन लक्षात घेऊन अपर जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी जिल्ह्यात बंदी आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये 31 जानेवारी 2020 पर्यंत जिल्ह्यात बंदी लागू करण्यात आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने दिनांक 29 जानेवारी रोजी पुकारण्यात आलेला भारत बंद व दिनांक 26 जानेवारी रोजी देशभर साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिना दिवशी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून प्र. अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 31 जानेवारी 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश जारी केला आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिराचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट; 90 दिवसांत होणार काम पूर्ण

सर्वांना माहित असतं आपला फोन टॅप केला जातो, पण मी त्याला गांभीर्याने घेत नाही – शरद पवार

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ जाहीर