विद्यार्थीनीचा विनयभंग : कराडातील डीएसके क्लासमधील एकास अटक

Karad Police Staion
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड शहरात असलेल्या अशोक चौकातील डीएसके क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार कराड शहर पोलिसात दाखल झाली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आले आहे. महेश अरुण कुर्ले (वय- 35, रा. शनिवार पेठ, अशोक चौक, कराड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील शनिवार पेठेत अशोक चौकामध्ये डीएसके क्लासेस आहे. त्याठिकाणी पिडीत मुलगी क्लाससाठी गेलेली असताना महेश कुर्ले याने तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. मला तु आवडतेस, असे म्हणून त्याने तीचा हात धरून तिच्याशी लगट केली.

तसेच मुलीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर करीत आहेत.