सोलापूर प्रतिनिधी । सोलापूरमधील श्राविका शाळेच्या मुलींनी बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निमंत्रण दिले. त्यावेळी एका विद्यार्थिनीने जिल्हाधिकाऱ्यांना मला IAS व्हायचंय ही कविता सादर केली. हि कविता ऐकून जिल्हाधिकारी हि भारावून गेले.
श्राविका शाळेचा वार्षिक बक्षिस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना आमंत्रण देण्यात आले. त्यावेळी शिक्षकांसहित काही विद्यार्थिनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. तेव्हा एका विद्यार्थिनीने जिल्हाधिकाऱ्यांना मला IAS व्हायचंय हि कविता म्हणून दाखवली.
कविता ऐकून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याही पापण्यांच्या कडा ओलावल्या. यावेळी आणि बक्षीस वितरणाला येण्याचे निमंत्रण दिले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.