कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड: एमपीएससी मार्फत १४ मार्च रोजी घेण्यात येणारी परीक्षा अचानक आयोगातर्फे कोरोनाचे कारण पुढे करीत पुढे ढकलण्यात आली. या अन्यायी निर्णयाविरोधात परीक्षार्थी रस्त्यावर उतरले त्यांच्यासोबत युवक काँग्रेस सुद्धा रस्त्यावर उतरून प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने मुंबईतील आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले. यादरम्यान पोलिसांनी शिवराज मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करून नंतर सोडून दिले. विद्यार्थ्यांचा प्रचंड रोष पाहता काल मुख्यमंत्र्यांनी माध्यमांच्या समोर येऊन उद्याच तारीख जाहीर करण्यात येईल व ती या आठ्वड्यामधीलच असेल असे सांगितले यानंतर विद्यार्थ्यांचा रोष मावळला.
मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करून आज आयोगामार्फत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे, नवीन परिपत्रकानुसार आता 14 मार्च रोजी होणारी परीक्षा 21 मार्च रोजी होणार आहे. नवीन परिपत्रकानुसार 21 मार्चनंतर होणाऱ्या बाकीच्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
या निर्णयाचे स्वागत सर्व विदयार्थ्यांच्या सहित युवक काँग्रेसने सुद्धा केले आहे याबाबत तसे ट्विट महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे व उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केले आहे. याचसोबत युवक काँग्रेसच्या वतीने काही सूचना सुद्धा केल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. सर्व प्रकारच्या सरकारी भरतींच्या बाबतीत एक सुनियोजित धोरण व पारदर्शक प्रक्रिया जाहीर करुन संभ्रमावस्था दूर करावी. तसेच 21 मार्चच्या परीक्षेला लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यातील परीक्षार्थींना विशेष प्रवासाची परवानगी देण्यात यावी, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group