सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षा या ऑनलाइन पद्धतीनेच व्हाव्यात यासाठी ठिय्या आंदोलन मांडले आहे. आंदोलन करणारे विद्यार्थी हे दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे असून परीक्षा ऑनलाईन हव्यात अशी त्यांची मागणी आहे. एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून त्यामुळे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना मोठा सामना करावा लागत आहे.
महाविद्यालयातील परीक्षा या ऑफलाइन होणार असल्याचे खूप उशिरा सांगितल्याने विद्यार्थ्यांनी कॉलेज व्यवस्थापना विरोधात हा ठिय्या मांडला होता. कमी वेळात ऑफलाईन परीक्षेसाठी तयारी कशी करायची असा प्रश्न उपस्थित करीत ऑनलाईनच परीक्षा घ्याव्यात व त्यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा या ऑनलाइन होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पेपर सुरू होण्याचा दिनांक 1 फेब्रुवारी असून अवघ्या चार दिवसावर ती परीक्षा सुरू होणार असल्याने मध्ये विद्यार्थ्यांच्या नाराजी व्यक्त केली आहे. युनिव्हर्सिटी मधील सर्व कॉलेजचे पेपर हे ऑनलाइन झाले ते केवळ याच कॉलेजमध्ये ऑफलाइन पेपर होणार असल्याने त्यास विरोध करत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले