राज्यातील ‘हे’ गाव ठरले देशातील पहिले मधाचे गाव; उद्योगमंत्री देसाईंकडून घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांना गुलाबी थंडीबरोबर मधाचा गोडवाही चाखायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील एक असे गाव आहे कि गेल्या अनेक दशकापासून मधाची निर्मिती करू लागले आहे. ते म्हणजे महाबळेश्वरमधील मांघर हे होय. या गावात मधमाशा पालनाद्वारे मधसंकलन व्यवसाय करण्याची योजना राज्य सरकारकडून राबविली जाणार आहे. 16 मे रोजी या योजनेचा शुभारंभ होणार असून, यासाठी या गावची निवड करण्यात आली असून हे देशातील पहिले मधाचे गाव ठरणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेत नुकतीच केली आहे.

सातारा जिल्ह्याची ओळख हि अनेक गोष्टींमुळे आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमुळे या ठिकाणी देशभरातील पर्यटक येत असतात. येथील भिलार या पुस्तकाच्या गावानंतर आता राज्यात देशातील पहिलं ‘मधाचं गाव’ साकारल जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार असून यासाठी महाबळेश्वरनजीक असलेल्या मांघर गावाची निवड करण्यात आली आहे. मधाचे गाव ही राज्य सरकारची एक महत्वपूर्ण संकल्पना आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1064383171127728

 

नेमक कुठं आहे हे गाव?

मधाचे गाव साकारण्यासाठी राज्यातील अनेक गावांची तपासणी केल्यानंतर महाबळेश्वर येथील मांघर या गावाची निवड करण्यात आली आहे. मांघर हे गाव महाबळेश्वरपासून ८ किलोमीटर अंतरावर डोंगर कड्याखाली वसलेले गाव आहे. गावाच्या भोवताली घनदाट जंगल असून या ठिकाणी वर्षभर सुंदर फुलं फुललेली असतात. या प्रकल्पासाठी याच गावाची निवड करण्याचं मुख्य कारण म्हणजे या गावात सामूहिक पद्धतीने मधमाशांचे संगोपन केले जाते.

Madhmashi

मधाचे गाव नेमकी संकल्पना काय आहे ?

मधाचे गाव या उपक्रमांतर्गत या मांघर गावात मधमाशांची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या निमित्ताने महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना शुद्ध व दर्जेदार मध मिळणार आहे. मधाचे गाव हा निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करण्याबरोबरच डोंगराळ व जंगली भागात राहणाऱ्या लोकांसाठी कायम स्वरुपी रोजगार निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे. निसर्गातील अन्न साखळीतील महत्वाचा घटक म्हणून मधमाशांकडे पाहिले जाते. मधमाशांच्यामुळे पिक उत्पादनात देखील भरघोस वाढ होत आहे. ही नेमकी संकल्पना या ठिकाणी राबविली जाणार आहे.

Honey

80 टक्के लोकसंख्या करते मध माशापालनाचा व्यवसाय

महाबळेश्वर तालुक्यातील मांघर या गावातील 80 टक्के लोकसंख्या ही मधमाशापालनाचा व्यवसाय करते. मधाचे गाव या उपक्रमांतर्गत या गावात मधमाशांची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या निमित्ताने महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना शुद्ध व दर्जेदार मध मिळणार आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्हात देखील हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

Leave a Comment