व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘NEET आणि JEE परीक्षा दिवाळीनंतर घ्या!’; सुब्रमण्यम स्वामींचा पंतप्रधान मोंदीना फोन

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयानं NEET आणि JEE परीक्षा घेण्याला परवानगी दिली. मात्र, NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी-पालक वर्तुळातून होत आहे. त्यामुळं भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. स्वामी यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.

“NEET आणि JEE परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात याव्या, यासाठी मी सकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी फोन करून शेवटचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयीन सचिवांनी फोन करून कळवतो, असं सांगितलं आहे. जर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला, तर मी विद्यार्थ्यांना कळवीन,” असं स्वामी यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

कोरोनामुळे देशातील स्थिती गंभीर झाल्यानं सुब्रमण्यम स्वामी हे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना याविषयी भूमिका घेण्याचं आणि पंतप्रधानांना कळवण्याचं आव्हान केलं होतं. “कोरोना काळात विद्यार्थ्यांना सुरक्षित व्यवस्था पुरवण्यास राज्य असमर्थ ठरत असतील, तर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तसं जाहीरपणे बोलावं आणि पंतप्रधानांनी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा करावी,” असं स्वामी म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.