औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर 2 ऑगस्ट पासून कारवाईचे आदेश प्रशासकांकडून देण्यात आले होते. आता या आदेशाची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली. यावेळी प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार झोन 1 पासून सुरुवात करण्यात आली असून सोमवारी या भागातील सहा वाहने जप्त करण्यात आली.
या भंगार बिनकामी वाहनांवर सात दिवसांची नोटीस लावण्यात येईल आणि सात दिवसानंतर वाहने उचलली नाही तर महानगर पालिकेकडून वाहने जप्त केली जाणार असल्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले होते. तरीही काहींनी ही नोटीस गरजेची समजली नाही म्हणुन त्यांच्यावर सात दिवस उलटल्यानंतर म्हणजेच सोमवारी हे वाहने जप्त करण्यात आले. यापैकी तीन वाहन मालकांनी कारवाई टाळण्यासाठी 12,000 रुपये दंड जमा केला.
आस्तिक कुमार पांडे यांनी या वाहनांचा तपशील आरटीओकडे पाठवण्याची सूचना दिली आणि वाहन नोंदणीची कागदपत्रे आणि त्याच्या मालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची शिफारस केली होती. आज कारवाईच्या पहिल्याच दिवशी महापालिका, पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी या मोहिमेला हाथभार लावला. महापालिकेने अतिक्रमणविरोधी पथक, यांत्रिक विभाग, पोलिस सुरक्षा आणि नागरिक मित्र पथक यांच्या कर्मचाऱ्यांसह ही मोहीम फतेह केली आणि मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सहा वाहने उचलली असल्याचे कार्यवाहक प्रभाग अधिकारी संजय सुरडकर यांनी सांगितले. महापालिका यांत्रिकी विभाग, अतिक्रमण हटाव विभाग, पोलीस, आरटीओ यांच्यावतीने ही कारवाई आजपासून करण्यात येणार आहे. निहाय झोन क्रमांक एक 48, झोन क्रमांक दोन 99, झोन क्रमांक तीन 6, झोन क्रमांक चार 18, झोन क्रमांक पाच 22, झोन क्रमांक सहा 5, झोन क्रमांक सात 28, झोन क्रमांक आठ 14 झोन क्रमांक नऊ 37 या ठिकाणी एवढे बेवारस वाहने उभी आहेत.