Wednesday, October 5, 2022

Buy now

UPSC परिक्षेत यश : साताऱ्यात ओंकार शिंदेचे वाजत- गाजत स्वागत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

नुकत्याच लागलेल्या युपीएससी निकालात महाराष्ट्रत 14 वा क्रमांकावर उत्तीर्ण झालेले ओंकार राजेंद्र शिंदे नुकताच साताऱ्यात दाखल झाला. साताऱ्यात आल्यानंतर त्यांचे कुटुंबीयांकडून आणि मित्रमंडळींकडून वाजत- गाजत स्वागत करण्यात आले. तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

ओंकार शिंदे हा यूपीएससीची तयारीसाठी बेंगलोर येथे गेला होता. ओंकार हा सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील सातारा जिल्हा परिषदेमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. 2017 मध्ये त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. घरातील थोरला मुलगा असलेल्या ओंकार यांनी आपले ध्येय यूपीएससी शिक्षणावर केंद्रित केलं.

आई- वडिलांचे ध्येय आणि आईची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी जिद्दीने अभ्यास करायला सुरुवात केली. ओंकारने देशात 433 वा क्रमांक मिळविला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.