Success Story | या शेतकरी बंधूनी नोकरी सोडून केली शेतीला सुरुवात; महिन्याला कमावतात करोडो रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story | भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारतातील जवळपास 75% पेक्षा जास्त शेतकरी शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे आपले सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत असतात. शेतकऱ्यांनी आर्थिक मदत व्हावी, यासाठी सरकार नवनवीन योजना आणत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील फायदा होत असतो. आजकाल अनेक शेतकरीहे पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलेले आहेत. आणि यातून त्यांना लाखो रुपयांचा नफा देखील होत आहे. आजकाल अनेक तरुण लोक देखील त्यांचा नोकरी व्यवसाय सोडून शेतीकडे वळत आहेत. आणि चांगले उत्पन्न देखील घेत आहेत. आज देखील आपण अशाच एका शेतकऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत. ज्याने शेती करून खूप चांगला नफा मिळवलेला आहे.

शेती करून धाराशिवमधील एक शेतकरी करोडपती झालेले आहेत. या शेतकऱ्यांचे नाव रामराजे गोरे आणि नागेश गोरे असे आहे. हे दोन शेतकरी सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणा आहेत. हे दोघे एकेकाळी नाला बिल्डिंगमध्ये देखभाल कामगार होते. परंतु सध्या हे दोघेजण सध्या 1.5 कोटी रुपये उत्पन्न कमावतात. गोरे बंधू हे धाराशिव मधील भूम तालुक्यातील अंतर गावचे रहिवासी आहेत यांनी 1993 साली त्यांचे दहावीचे शिक्षण पूर्ण केले. परंतु त्यावेळी त्यांची घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. म्हणून त्यांनी पुढचे शिक्षण पूर्ण न करता नाला बांधकामात राहण्याच्या कामाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी सैन्यात भरती होण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु ते होऊ शकले नाही, काही काळानंतर त्यांनी पुण्यात आले आणि टेल्को ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. हे सुरू करताना त्यांनी शेतात अनेक प्रयोग केले.

त्यानंतर त्यांना शेतीतून चांगले उत्पन्न होत असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी पुण्यातील नोकरी सोडून दिली
आणि मिळेल त्या पैशातून शेती करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून त्यांनी शेतीला सुरुवात केली. त्यांनी एक विहीर खोदली आणि आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. त्यांचे भाऊ नागेश गोरे त्यांनी देखील या कामात त्यांना खूप मदत केली. आणि आजही दोघे बंधू खूप यशस्वीरित्या काम करत आहेत.

त्यांना जे थोडेफार उत्पन्न मिळायला लागले. त्यानंतर त्यांनी दीड एकर जमीन, तीन विहिरी, 9 एकर द्राक्ष, तीन एकर डाळिंब सात एकर क्षेत्रात मिरचीची लागवड केली. त्या पूर्ण त्यांच्या विहिरीतूनच पाणीपुरवठा होतो. त्यांनी सांगितले की दरवर्षाला ते दीड कोटी रुपयांपर्यंत कमाई करतात. अशा प्रकारे त्यांनी करोडपती होण्याचा एक प्रवास पूर्ण केलेला आहे. आणि संपूर्ण शेतकऱ्यांसमोर हा एक खूप मोठा आदर्श आहे.