Success Story | 10 वीनंतर दूध व्यवसाय सुरु करून; शेतकऱ्याची कन्या बनली कोट्यवधींची मालकीण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story | आजकाल असे अनेक लोक आहेत. जे जास्त शिकलेले असले, तरी देखील नोकरी न करता व्यवसाय करतात. कारण व्यवसायामध्ये त्यांना चांगले काम करता येते. तसेच चांगला नफा देखील कमावता येतो. असे अनेक शेतकरी तरुण आहेत. ज्यांनी मध्येच शिक्षण सोडले आणि ते शेती व्यवसायामध्ये काम करत आहे. आज काल शेती तसेच शेतीचे अनेक असे जोड व्यवसाय आहेत, ज्यामध्ये लोक आधुनिक पद्धतीने व्यवसाय करत आहेत. आणि चांगल्या नफा कमवत आहे. आज आपण अशाच एका तरुणीची कहाणी (Success Story) जाणून घेणार आहोत. जिने दहावीनंतर शाळा सोडली आणि दूध व्यवसायात प्रगती केलेली आहे.

बाजारात जरी दुधाचे भाव जास्त असले तरी शेतकऱ्याकडून जेव्हा दूध जाते. तेव्हा त्याचे भाव अत्यंत कमी मिळतात. त्याचप्रमाणे गाई म्हशींच्या खाद्याचा खर्च इतर सगळा खर्च पकडून शेतकऱ्यांना सहसा दूध व्यवसायात नफा होत नाही. परंतु ही सगळी मानसिकता तोडून काढण्यासाठी दहावी उत्तीर्ण झालेल्या श्रद्धा धवन हीने दूध व्यवसायात झेप घेतलेली आहे. ती खूप चांगल्या प्रकारे हा दूध व्यवसाय सांभाळते आणि या व्यवसायातून तिने एक कोटीची कमाई देखील केली आहे.

वडिलांना मदत म्हणून झाली व्यवसायाची सुरुवात | Success Story

श्रद्धा धवन ही अहमदनगर जिल्ह्यातील निघोज या गावातील रहिवासी आहे. तिचे संपूर्ण कुटुंब आधीपासूनच जनावरांची खरेदी यांनी विक्री करत असतात. त्यांचा एक छोटासा व्यवसाय होता. त्याचप्रमाणे त्यांना जमीन देखील अत्यंत कमी होती. त्यामुळे ते जनावरांची खरेदी विक्री करायचे. दहावीची परीक्षा झाल्यानंतर श्रद्धा वडिलांना मदत म्हणून जनावरांच्या खरेदी आणि विक्री करण्याच्या व्यवसायामध्ये त्यांना मदत केली. म्हैस कशी ओळखायची, खरेदी करण्यापूर्वी त्या गोष्टीची कोणती कोणती माहिती पाहिजे, लीलाव कसा करतात, योग्य किंमत कशी ओळखायची, या छोट्यातल्या छोट्या गोष्टी तिने शिकून घेतल्या. आणि यातूनच तिला तिच्या भविष्यातील एक नवीन व्यवसाय उमगला.

श्रद्धाने 2013 साली घरीच काही म्हशींना पाळून दूध व्यवसाय सुरू करायचा असा निर्णय घेतला. आणि तिचा हा एक निर्णय तिच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उजळून टाकणारा ठरला. परंतु व्यवसाय करताना तिला शिक्षणाकडे देखील लक्ष द्यायचे होते. तिने तिचे एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे वडिलांचा व्यवसायात मदत करण्यात आलेली नाही घेतला. तिने सुट्ट्यांमध्येच दूध व्यवसायाबद्दलची सगळी माहिती घेतली. जेव्हा अकरावी सुरू झाली त्यावेळी तिने दुधाचा स्टार्टअप सुरू केला होता. हळूहळू तिने त्यांच्या गोठ्यातील गाई आणि म्हशींची संख्या वाढवली. त्यानंतर तिने या गोठ्यामध्ये काम करण्यासाठी कामगार देखील नेमले. सध्या तिच्याकडे 130 म्हशी आहेत. ती सध्या राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी दूध आणि दुधापासून बनवलेले प्रॉडक्ट्स पाठवत असते. यामध्ये ती तूप, लोणी, लस्सी, ताक, दही इत्यादी पदार्थ पाठवते.

एका वर्षात कोट्यवधीची मालकीण

श्रद्धा दुधापासून बनवलेली सगळी उत्पन्न उत्पादने ही घरी नैसर्गिक पद्धतीने बनवत असते. यासोबतच श्रद्धाने एक फार्मचा टन बायोगॅस देखील सुरू केलेला आहे. या ठिकाणी सेंद्रिय खत बनवले जाते. खते ती शेतकऱ्यांना तसेच कृषी कंपन्यांना देखील विकते. तिला सध्या भारतभर ई-मेलच्या माध्यमातून ऑर्डर्स येतात. तिने अगदी वर्षभरातच हा कोट्यावधीचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि तिच्या कुटुंबाला एक वेगळी दिशा दिलेली आहे.