महाराष्ट्राचे सुपुत्र त्रिपुरा केडरचे तरुण IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचे कोरोनामुळे निधन.

0
90
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । 2015 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी असलेले सुधाकर शिंदे (त्रिपुरा केडर) यांचे आज शुक्रवारी कोरोना विषाणू संसर्गमुळे निधन झाले. सुधाकर शिंदे हे मूळचे परभणी येथील रहिवासी होते.

आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांना कोरोना संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यानंतर प्रथम त्यांना नांदेडहून औरंगाबाद हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले व प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना पुण्यात आणण्यात येत होते.

मात्र पुण्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.  त्रिपुरामध्ये तैनात असलेले सुधाकर शिंदे हे परभणी येथील रहिवासी होते आणि काही दिवसांपूर्वी सुट्टीवर घरी आले होते.  ते येथे येताच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्या पश्चात एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे.

एका तरुण सनदी अधिकाऱ्याचा कोरोना मुळे मृत्यु झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लबकुमार देब यांनीही राज्यातील एक उत्कृष्ट अधिकारी गमावला म्हणून शोक व्यक्त केला आहे.  प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी व त्यांचे समपदस्थ असलेले सहकारी यांनी शिंदे यांच्या निधनाबद्दल ट्विटर वर व्यक्त होऊन श्रद्धांजली अर्पण केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here