‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात सुरु होणार साखर हंगाम; अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहे. राज्यात आपण कृषी क्षेत्राबद्दल विचार केला तर मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ऊस क्षेत्र हे दोन लाख हेक्टरने कमी झालेले आहे. त्यामुळे आता जे साखर कारखाने आहेत त्यांना चांगला ऊस मिळावा आणि हा हंगाम पूर्ण कालावधीत सुरू व्हावा अशी मागणी अनेक लोकांची होती. यासाठी कर्नाटक प्रमाणे राज्यातील साखर हंगाम 15 नोव्हेंबर पासून सुरू करण्याबाबत निर्णय मुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला आहे

यावर्षीचा साखर हंगाम हा मागील वर्षाच्या तुलनेत 15 दिवसांनी उशिरा सुरू होणार आहे. त्यामुळे कारखाने देखील दिवाळीनंतर चालू होणार आहे. परंतु त्यापूर्वी उसाची तोडणी, ओढणी यंत्र आणून नियोजन करणे हे खूप महत्त्वाचे असणार आहे. यावर्षी मागील वर्षाच्या पाऊस देखील खूप जास्त झालेला आहे. त्यामुळे पिकं देखील खूप चांगली वाढलेली आहे. परंतु संपूर्ण राज्यात काही ठिकाणी अजूनही पाऊस चालू आहे. त्याचप्रमाणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये परतीचा पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस या पिकाला आणखी ओलावा मिळेल आणि ऊस तोडणीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

पावसाचा आणि उसाच्या पिकाचा अंदाज घेताआता ऊस तोडणी ही दिवाळीनंतर सुरू करावी, अशी मागणी साखर उद्योगाची असलेल्या संघटनेने केली होती. आणि आता याच मागणीचा विचार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 नोव्हेंबर नंतर हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच इतर लोकांनी देखील याला मान्यता दाखवली आहे.

आपल्या महाराष्ट्रामध्ये उसाचे क्षेत्र खूप जास्त प्रमाणात असते. आणि ऊस देखील चांगल्या प्रमाणात तोडला जातो. परंतु यावर्षी उसाचे क्षेत्र हे दोन लाख हेक्टरने कमी झालेले आहे. त्यामुळे आता कारखान्यांना देखील चांगला ऊस मिळावा. अशी अनेक उद्योगांची उद्योगाची मागणी होती. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणात गाळपासाठी कर्नाटकात जात असतो. त्यामुळे कर्नाटक सरकारने देखील यावर्षीचा ऊस हंगाम 15 नोव्हेंबर नंतर सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याची माहिती त्यांनी महाराष्ट्र सरकारला देखील दिलेली आहे.

संपूर्ण हवामानाचा आणि उसाच्या पिकाचा अंदाज घेता. ऊस हंगाम 15 नोव्हेंबर पासून सुरु करावा, अशी मागणी बैठकीत होती. आणि ती मागणी मंजूर झालेली आहे. या बैठकीत साखर आयुक्त कुणाल खेमनार आणि सहसंचालक मंगेश हे देखील उपस्थित होते. तसेच या बैठकीला अनेक लोक उपस्थित होते आणि त्यांच्या सहमतानेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे.