बांधकाम विभागातील लिपिकाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोयनानगर येथील कोयना बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संतोष बंडू कुंभार (वय- ४०, रा. देशपांडेवाडी – बोपोली, ता. पाटण) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कुंभार हे देशपांडेवाडी – बोपोली येथील रहिवाशी आहेत. संतोष हे जून २०२० मध्ये जलसंपदा विभागातील कोयना बांधकाम विभागात लिपिक पदावर कामास सुरुवात केली होती. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कोयना येथील शासकीय निवास्थानात कुंभार कुटुंबीय सध्या वस्त्यव्यास आहे.

देशपांडेवाडी- बोपोली येथील संतोष कुंभार हे पत्नी व मुलांसह कोयनानगर येथे राहत होते. सोमवारी सांयकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर कोयनानगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरा घटनेची नोंद करण्याचे काम पोलीस स्टेशनमध्ये चालू होते.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment