धक्कादायक ! कोरोना बाधित रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

बीड | कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णाने गळ्यातील रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी पहाटे बीड शहरातील दिप हॉस्पिटलमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बीड शहर पोलीस ठाण्याचे पीआय रवी सानप यांच्यासह पोलीसांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, बीड शहरातील दिप हॉस्पिटलमध्ये रामलिंग महादेव सानप (वय ३५ वर्षे, रा. तांदळ्याची वाडी) हे कोरोनावर उपचार घेत होते. शुक्रवारी पहाटे त्यांनी हॉस्पिटलमधील तिसर्‍या मजल्यावर स्वत:जवळील रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांना मिळताच घटनास्थळी पीआय रवि सानप, एपीआय अंतरप, एएसआय बब्रुवान गांधले यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. नातेवाईकांनी शवविच्छेदनाची मागणी केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयातील पीएम रुममध्ये दुपारी एक वाजेपर्यंत होता. पीएम झाले नसल्याने नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पीएम करण्याची मागणी केली.

दरम्यान, ही आत्महत्या का केली याची उशिरापर्यंत माहिती मिळाली नव्हती. तर दुसरीकडे रुग्णालयात आत्महत्या झाल्याने तेथील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी सर्व बाजुंनी चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे. एकंदरीतच सध्या काही प्रसारमाध्यमे व काही लोकांकडून समाजामध्ये कोरोनाची विनाकारण भिती पसरविण्याचे काम सुरू आहे. या भितीपोटी ही आत्महत्या झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Comment