नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईतील रबाळे या ठिकाणी एका पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येची (Suicide) नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला व पुढील तपासाला सुरूवात केली.
पोलीस तपासानंतरच सत्य समोर येईल
मृत मुलगी नवी मुंबईतील रबाळे येथील रहिवासी असून इयत्ता पाचवीमध्ये शिकत होती. मागच्या काही दिवसांपासून मृत मुलगी शांत शांत राहत होती. मैत्रिणींशीही बोलत नव्हती, अशी माहिती तिच्या मैत्रिणीकडून देण्यात आली आहे. या मुलीच्या परिसरात राहणारा एक मुलगा काही कारणावरुन धमकावत होता, अशी माहिती प्राथमिकदृष्या समोर आली आहे. हा मुलगासुद्धा तिच्याच वयाचा आहे. याच कारणातून मुलीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याचे समजत आहे. हा मुलगा नेमका कोण आहे ? तो कसली धमकी मुलीला देत होता ? याबाबत रबाळे पोलीस तपास करत आहेत.
औरंगाबादमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या
औरंगाबादमध्येदेखील एका प्रेमीयुगलाने एका हॉटेलमध्ये अज्ञात कारणावरून आत्महत्या (Suicide) केली आहे. सुमारे तीन दिवस या दोघांचे मृतदेह हॉटेलमध्ये पडून होते. तीन दिवसांनंतर मृतदेहांना वास येऊ लागल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रुमचा दरवाजा खोलून पाहिला असता दोघे जण मृतावस्थेत आढळले. यावेळी प्रियकर फॅनला लटकला होता तर प्रेयसीचा मृतदेह (Suicide) पलंगावर पडला होता. या प्रेमीयुगलाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???