आम्हाला विकत घेतो काय? शेतकर्‍यांच्या पोरांचा सुजय विखेंना २ हजाराचा चेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी । पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक ६ हजार रुपये देण्याच्या नरेंद्र मोदींच्या योजनेचा अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी राम शिंदे यांच्या प्रचार सभेत उल्लेख केला होता. त्यावेळी २ हजार देणारे मोदी तुम्हाला चालतात, मग निवडणुकीवेळी का चालत नाहीत असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला एका स्थानिक शेतकऱ्याने सडेतोड उत्तर देऊन सुजय विखेंना घरचा आहेर दिला आहे.

तुमच्या २ हजार रुपयांची भीक आम्हाला नको अस उत्तर देतानाच शेतकऱ्याने २ हजार रुपयांचा चेकही सुजय विखेंच्या नावाने पाठवला आहे. छात्रभारतीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय रावसाहेब ढगे यांनी सदर अर्ज आणि चेक सुजय विखेंसाठी पाठवला असून शेतकऱ्यांची काडीमात्र किंमत न करणाऱ्या राम शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या निवडणुकीत अजिबात मदत करू नका असा संदेशही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.