सुजय विखे इतक्या कोटींचे मालक..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात

  नगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे हे 11 कोटी 17 लाखांचे मालक आहेत. तर त्यांच्या पत्नी धनश्री या 5 कोटी 7 लाखांच्या मालकीण आहेत. सुजय यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. पत्नीकडे मात्र प्रवरा बँकेचे 26 लाख 23 हजारांचे कर्ज आहे. विखे यांचे नाव शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदविले गेले असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.

   सुजय यांच्याकडे 4 कोटी 91 लाखांची जंगम आणि 6 कोटी 25 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
गेल्या आर्थिक वर्षात 1 कोटी 68 लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न घटून सुजय विखे यांचे वार्षिक उत्पन्न 86 लाख 10 हजार 202 इतके झाले आहे. पत्नीचे वार्षिक उत्पन्न 35 लाख 42 हजार इतके आहे. या दोघा पती-पत्नींवर एकही गुन्हा दाखल नाही. सुजय विखे यांच्याकडे केवळ 1 लाख 16 हजार 295 रुपयांची रोकड आहे. पत्नीकडे 1 लाख 37 हजार 485 रुपये रोकड आहे.

   सुजय यांच्याकडे 3 कोटी 65 लाख 23 हजार 468, तर पत्नीकडे 1 कोटी 90 लाख 91 हजार 617 रुपयांच्या बँक खात्यातील ठेवी आहेत. सुजय यांच्याकडे 5 लाख 71 हजार 300 रुपयांचे आणि पत्नीकडे 67 हजार रुपयांचे शेअर्स गुंतवणूक आहेत. विखे यांची 16 लाख 65 हजार रुपयांची, तर पत्नीकडे 5 लाख 85 हजार रुपयांची विमा पॉलीसी आहे.