वायुदलाची 2 लढाऊ विमाने कोसळली; सुखोई-30 आणि मिराज-2000 क्रॅश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय वायुदलाची (Airforce) 2 लढाऊ विमाने सुखोई-30 (Sukhoi30) आणि मिराज 2000 (Mirage2000) मध्य प्रदेशातील मुरैना येथे क्रॅश झाली आहेत. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते ज्याठिकाणी त्यांचा सराव सुरू होता. या घटनेनंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

माहितीनुसार, पहाडगढपासून पाच किमी अंतरावर असलेल्या निरार रोडवरील मडवली मातेजवळ विमान अपघात झाला.अपघातादरम्यान सुखोई 30 मध्ये दोन पायलट होते तर मिराज 2000 मध्ये एक पायलट होता. यातील 2 वैमानिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे तर हवाई दलाचे हेलिकॉप्टर तिसऱ्या पायलटच्या शोधात आहे.

या दुर्घटनेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सीडीएस जनरल अनिल चौहान आणि आयएएफ प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या संपर्कात असून अपघाताचे सर्व तपशील त्यांनी मागितले आहेत. तसेच त्यांनी आयएएफ वैमानिकांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि आपलं या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष असल्याचे सांगितलं.