Summer Diet | मार्च महिना संपायला अगदी काहीच दिवस उरले आहेत. आता उन्हाळा हा ऋतू सुरू झालेला आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलेला आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात काय होईल याचा विचार करूनच आता सगळ्या नागरिकांना टेन्शन आलेले आहे. कारण आता उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. आता ही उष्णतेची लाट कशी टाळायची? यासाठी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. या काळात काही वेगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे.जेणेकरून आपले शरीर हायड्रेटेड राहील आणि त्या गोष्टीमुळे उष्णता वाढते अशा गोष्टींचे सेवन (Summer Diet) करणे टाळले पाहिजे.
उष्माघात टाळण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा | Summer Diet
आंब्याचे पन्हे
उन्हाळ्यात जर तुम्ही आंब्याचे पन्हे खाल्ले तर तुमच्या आरोग्यास खूप फायदा होतो. हे पन्हे एक कैरी आणि मसाल्यांनी बनवलेली जाते. हा एक कुलिंग इफेक्ट आहे. जो तुम्हाला उष्णतेपासून वाचवतो. तुम्ही दिवसातून किमान दोन ते तीन वेळा आहे तिने खूप गरजेचे आहे .
चिंचेचे पाणी
चिंचेच्या पाण्यामध्ये जीवनसत्वे खनिज आणि इलेक्ट्रॉनिक्स भरपूर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे चिंच उकळत्या पाण्यात भिजवावी त्यानंतर चिमूटभर साखर टाकून हे प्यावे. त्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान कमी होते. त्याचप्रमाणे चिंचेचा रस पोटाच्या आजारांवर देखील उपायकारक आहे.
ताक आणि नारळाचे पाणी | Summer Diet
उन्हाळ्यात ताक आणि नारळाचे पाणी पिणे तुमच्या शरीरासाठी खूप चांगले आहे. हे तुमच्या शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्वे आणि खनिजे पुरवतात. यामुळे तुमच्या शरीराचे तापमान देखील संतुलित राहते.
उष्णता टाळण्यासाठी हे उपाय देखील करा
- तुम्ही जर बाहेर जात असाल तर त्यावेळी तुमचे संपूर्ण तोंड झाकून जा. तुमच्या शरीर डीहायड्रेट होऊ नये यामुळे वारंवार पाणी प्या.
- दिवसातून दोन ते तीन वेळा लिंबू सरबत प्या.
- उन्हातून आल्यावर लगेचच पाणी पिऊ नका तुमच्या शरीराचे तापमान नॉर्मल झाल्यानंतर पाणी प्या.
- उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी सुती आणि सैल कपडे घाला.
- घरातून बाहेर पडताना शक्यतो छत्री घेऊन जा. आणि सोबत पाण्याची बाटली बाटली ठेवायला विसरू नका.