हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Disease) सध्या सूर्य असा काही आग ओकतोय जणू जानी दुश्मनच!! गरमीने हैराण झालेल्या जीवाची बैचेनी रोज थोडी थोडी वाढतेय. उन्हाचा तडाखा जसजसा वाढतोय तसतशी उष्णतेची लाट सोबत आजारपण घेऊन येऊ लागली आहे. उन्हाळा आला की त्यासोबत काही आजार येतात. आता वाढती गरमी याच आजारांना आयत आमंत्रण देतेय असं वाटतय. त्यामुळे या सर्व आजारांबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात विविध रोग आणि संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे विशेष खबरदारी घ्यायला हवी. चला तर उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांची माहिती घेऊया आणि आपली काळजी घेऊया.
1. डिहायड्रेशन (Summer Disease)
उन्हाळ्यात डिहायड्रेशन ही समस्या अत्यंत सामान्य आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास पीडित व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर ओळख आणि उपचार आवश्यक आहेत.
लक्षणे – डोकेदुखी, चक्कर येणे, घसा कोरडा पडणे, अशक्तपणा जाणवणे.
उपाय – डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या. फळांचा रस, नारळपाणी आणि इतर पेय पिऊन शरीरातून घामावाटे कमी होणाऱ्या पाण्याची मात्रा भरत रहा.
2. अतिसार
उन्हाळ्यात होणाऱ्या सामान्य समस्यांमध्ये अतिसारदेखील होऊ शकतो. (Summer Disease) कारण उन्हळ्यात वाढत्या गरमीने पचनाच्या समस्या वाढतात. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये निष्काळजीपणा करू नका. अतिसाराची समस्या गंभीर होण्याआधी काळजी घ्या.
लक्षणे – वारंवार जुलाब होणे, उलट्या होणे, सूज येणे किंवा पोटात दुखणे.
उपाय – भरपूर पाणी पिणे आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणे.
3. कांजिण्या
उन्हाळ्यात संसर्गाचा अधिक धोका असतो. त्यामुळे कांजिण्यांचा प्रसार वेगाने होतो. व्हॅरिसेला झोस्टर नावाच्या विषाणूमुळे हा आजार पसरतो. यामध्ये बाधित व्यक्तीच्या शरीरावर पुरळ उठतात आणि फार त्रास होतो.
लक्षणे – अंगावर पाणीदार पुळ्या उठणे, ताप येणे, डोकेदुखी, कोरडा खोकला (Summer Disease)
उपाय – कांजण्या टाळण्यासाठी वैयक्तिक आणि आसपासच्या परिसराची स्वच्छता राखा. पीडित व्यक्तीच्या संपर्कात येताना खबरदारी घ्या.
4. फूड पॉयझन
उन्हाळ्यात फूड पॉयझनची समस्या होऊ शकते. कारण आर्द्रतेमुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात आणि त्यात बॅक्टेरिया वाढतात. असे पदार्थ खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते. (Summer Disease)
लक्षणे – मळमळ, उलट्या, पोटदुखी.
उपाय – फूड पॉयझन होऊ नये म्हणून ताजी फळे आणि ताज्या अन्नाचे सेवन करा. कोणतेही फळ वा भाजी धुतल्याशिवाय खाऊ नका.
5. गालगुंड
गालगुंड हा उन्हाळ्यात होणारा एक संसर्गजन्य रोग आहे. या संसर्गात कान आणि जबड्यामध्ये स्थित पॅरोटीड ग्रंथी प्रभावित होते. ज्यामुळे पीडित व्यक्तीला प्रचंड त्रास होतो.
लक्षणे – घशात सूज येणे, थंडी वजने, ताप येणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे.
उपाय – प्रतिबंधासाठी गरम पाण्याने गुळण्या आणि पातळ पदार्थांचे सेवन करा. (Summer Disease) स्थिती गंभीर वाटल्यास डॉक्टरांकडे जा. गालगुंडांवर उपचार करण्यासाठी एंटीबायोटिकचा वापर केला जाईल.