हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Diseases) कोणताही ऋतू आपल्यासोबत वेगवेगळ्या आजारांना घेऊन येत असतो. त्यात उन्हाळा म्हटलं की वाढत्या उष्णतेसोबत अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या डोकं वर काढू लागतात. अशा आरोग्याशी संबंधित समस्यांना बळी पडल्याने शारीरिक तसेच मानसिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे गरमीच्या दिवसात शारीरिक आरोग्यासोबत, मानसिक आणि त्वचेच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागते.
सामान्यपणे उन्हाळ्याच्या दिवसात काही विशेष आजार होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये डिहायडेशन, कांजण्या, टायफाईड, फूड पॉयझन आणि डोळ्यांचे संक्रमण अशा गंभीर समस्यांचा (Summer Diseases) समावेश आहे. वाढत्या गरमीसोबत असे आजार होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यावी? चला जाणून घेऊया.
डिहायड्रेशनची समस्या
डीहायड्रेशन म्हणजे काय तर शरीरातील पाण्याची कमतरता. सर्वसामान्यपणे उन्हाळ्याच्या दिवसात घामावाटे शरीरातून पाणी बाहेर पडते. परिणामी शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि डीहायड्रेशनची समस्या जाणवते. उन्हात सूर्यप्रकाशाची तीव्रता इतकी जास्त असते की, त्यामुळे शरीरात निर्जलीकरण होते.
डिहायड्रेशनमुळे चक्कर येणे, अशक्तपणा यांसारख्या समस्या निर्माण होतात. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात विशेष करून शरीरातील पाण्याची पातळी कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. (Summer Diseases) यासाठी वेळोवेळी पुरेसे पाणी पिणे, पाण्याची मात्रा अधिक असणारी फळे खाणे, फळांचा ज्यूस किंवा शहाळ्याचे पाणी, दही, ताक, लिंबू सरबत यांसारख्या पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
टायफाईड होऊ शकतो
उन्हाळ्याच्या दिवसात टायफाईड होण्याची शक्यता देखील सर्वाधिक असते. टायफाईड झाल्यास शरीराचे तापमान वाढते आणि प्रचंड ज्वर येतो. शिवाय डोकेदुखी दीर्घ काळ राहते.(Summer Diseases) मुख्य म्हणजे, असा ताप लवकर उतरत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात सडलेले मांस किंवा दूषित पाणी प्यायल्याने हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे विशेष करून आपल्या आहाराकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, हे लक्षात घ्या. तसेच टायफाईडची लक्षणे दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करा.
फूड पॉइझन होण्याची शक्यता (Summer Diseases)
गरमीच्या दिवसात अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, हवामानात झालेले बदल अन्नपदार्थांवर परिणाम करत असतात. यात तापमानातील उष्णता इतकी जास्त असते की, त्यामुळे जिवाणूंची वाढ होते आणि अन्न लवकर खराब झाल्यामुळे हे जिवाणू अन्नावर मारा करतात. असे अन्न पोटात गेल्याने फूड पॉइजन होण्याची शक्यता असते. शिवाय पोटाचे विविध आजार देखील होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात काहीही करून आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.
अंगावर कांजण्या उठणे
तीव्र उन्हाळ्यात कांजण्या होणे ही सामान्य समस्या मानली जाते. कांजण्या म्हणजे काय? तर द्रव्याने भरलेले पुरळ अंगावर उठणे आणि त्याला खाज सुटणे. हे पुरळ फुटल्यास अत्यंत वेदना होतात. डीहायड्रेशनमुळे कांजण्या होतात आणि त्यामुळे उन्हाळ्यात डीहायड्रेशन होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. (Summer Diseases) आवश्यक तेव्हढे पाणी, फळांचे रस, भाज्यांचे सूप, हर्बल टीचे सेवन करावे. मुख्य म्हणजे अल्कोहोल, कॅफिन तसेच कोल्ड्रिंक प्यायल्याने ही समस्या वाढू शकते. त्यामुळे अशी पेये प्रामुख्याने टाळावीत.
डोळ्यांचे संक्रमण होते
उन्हाळ्यात डोळ्यांच्या बुबुळांच्या पुढील भागाचा दाह होणे, एलर्जी होणे, डोळ्यात उष्णता उठणे अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे अशा दिवसात आपल्या डोळ्यांची काळजी घ्यावी. यासाठी घरातून बाहेर जाताना डोळ्यांवर गॉगल लावणे, उन्हातून घरी आल्यावर थंड आणि स्वच्छ पाण्याने डोळे धुणे, डोळ्यावर काकडीच्या चकत्या ठेवून आराम करणे अशा टिप्सचा वापर करावा. यामुळे डोळ्यांचे संक्रमण होण्याची शक्यता कमी होते. (Summer Diseases)