हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्याचा सीजन असून सुट्ट्यांच्या या दिवसात अनेक चाकरमानी आपल्या घरी जात असतात. त्यामुळे उन्हाच्या या कडाक्यात प्रवाशांचा प्रवास सुखरूप आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे विभागाने उन्हाळी स्पेशल ट्रेन (Summer Special Train) सुरु केल्या आहेत. मात्र तरीही गाड्यांची आणखी मागणी लक्षात घेऊन आणि रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दादर-गोरखपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपूर आणि सीएसएमटी मुंबई-दानापूर दरम्यान अतिरिक्त अनारक्षित उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.
१) दादर-गोरखपूर अनारक्षित विशेष (६ ट्रिप)
दादर-गोरखपूर 01015 अनारक्षित स्पेशल ट्रेन दादरहून 27 एप्रिल, 1 मे आणि 4 मे रोजी रात्री 11.30 वाजता निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 09.30 वाजता गोरखपूरला पोहोचेल. (३ ट्रिप )
01016 अनारक्षित स्पेशल गोरखपूर येथून 29 एप्रिल 03 मे आणि 06 मे रोजी दुपारी 3.30 वाजता निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 00.25 वाजता (मध्यरात्री) दादरला पोहोचेल. ही ट्रेन ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा आणि बस्ती या रेल्वे स्थानकावर थांबेल. या रेल्वेमध्ये 10 स्लीपर क्लास, 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 8 सामान्य द्वितीय श्रेणीचा समावेश असेल.
२) LTT मुंबई-गोरखपूर अनारक्षित स्पेशल (4 ट्रिप)- Summer Special Train
01427 अनारक्षित विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई 26 एप्रिल आणि 01 मे रोजी 23.50 वाजता निघेल आणि तिसऱ्या दिवशी 09.30 वाजता गोरखपूरला पोहोचेल. (2 ट्रिप) 01428 अनारक्षित विशेष गोरखपूर 28 एप्रिल आणि 03 मे रोजी 15.30 वाजता निघेल आणि एलटीटी मुंबईला तिसऱ्या दिवशी 00.25 वाजता पोहोचेल. (2 ट्रिप) ही रेल्वे ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा आणि बस्ती या स्थानकांवर थांबेल.
३) CSMT मुंबई-दानापूर अनारक्षित स्पेशल (2 ट्रिप)
01051 अनारक्षित स्पेशल 28 एप्रिल रोजी CSMT मुंबईहून 23.20 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 11.00 वाजता दानापूरला पोहोचेल. (1 ट्रिप) तर 01052 अनारक्षित विशेष गाडी 30 एप्रिल रोजी 13.30 वाजता दानापूरहून सुटेल आणि CSMT मुंबईहून दुसऱ्या दिवशी 17.00 वाजता पोहोचेल. ही रेल्वेगाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या स्थानकांवर (Summer Special Train) थांबेल.