हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या उन्हाळी सुट्ट्या (Summer Holidays) सुरू असल्यामुळे पुण्याहून मोठ्या संख्येने भाविक प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी अयोध्याला (Aayodhya) जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पुणे ते अयोध्यादरम्यान भाविकांसाठी उन्हाळी विशेष गाड्या (Summer Special Train) चालवल्या जाणार आहेत. ज्यात एकूण चार गाड्यांचा समावेश असणार आहे. ज्यात पुणे ते अयोध्या 2 आणि अयोध्या ते पुणे 2 अशा विशेष गाड्या भाविकांसाठी सोडल्या जाणार आहेत. (Pune To Aayodhya Special Train)
वेळापत्रक कसे असेल?
खास गोष्ट म्हणजे, रेल्वे प्रशासनाकडून समर स्पेशल ट्रेनला उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे पुण्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाविकांना अयोध्याला जाणे अधिक सोयीचे होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते अयोध्या विशेष ट्रेन 3 ते 7 मे रोजी पुणे रेल्वे स्थानकावर रात्री साडेसात वाजता सोडली जाईल. ही ट्रेन तिसऱ्या दिवशी अयोध्याच्या स्थानावर सकाळी 8.50 वाजता पोहचेल. तसेच, 01456 ही समर स्पेशल ट्रेन अयोध्यातील रेल्वे स्थानकावरून 5 मे रोजी आणि 9 मे रोजी दुपारी चार वाजता सोडली जाईल. ही ट्रेन पुण्यात तिसऱ्या दिवशी दुपारी 3.55 वाजता पोहचेल.
थांबा कोण-कोणता असेल?
या विशेष गाड्या 16 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहेत. ज्यात चिंचवड, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना, झाशी, ओराई, कानपूर आणि लखनौ अशा रेल्वे स्थानकांचा समावेश असेल. या गाड्या मनमाड, जळगाव भुसावळ या रेल्वे स्थानकावर थांबणार असल्यामुळे येथील प्रवाशांना अयोध्याची ट्रेन पकडण्यासाठी पुण्यात जावे लागणार नाही.
तिकिट किती असेल?
विशेष गाड्यांचे तिकीट दर पाहिला गेलो तर प्रवाशांना स्लीपर कोचसाठी 675 रुपये मोजावे लागतील. तर AC साठी 1775 रुपये भरावे लागतील. यासह जनरलसाठी 315 रुपये मोजावे लागतील. अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.