हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही दिवसातच आता सगळ्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत. महाराष्ट्रातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सगळ्या शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी चालू राहणार आहे. शिक्षक संचालकाने हा आदेश काढलेला आहे. त्याचप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही दरवर्षीप्रमाणे 15 जूनपासून होईल असे देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे. (Summer Vacation Of School)
राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळा 2 मे पासून उन्हाळी सुट्टी आहे. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा या वेळापत्रकाप्रमाणे सुरू असल्यास किंवा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास, त्यांनी विद्यार्थ्यांना कधीपासून उन्हाळी सुट्टी द्यायची हा निर्णय घ्यावा. असे देखील शिक्षण मंडळांनी स्पष्ट केलेले आहे. परंतु शिक्षण मिळाले दिलेल्या माहितीनुसार 2 मे पासून सगळ्या शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर केलेली आहे.
विदर्भ वगळता आगामी शैक्षणिक वर्ष हे 15 जूनपासून सुरू होणार आहे. असे आदर्श देखील प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी माध्यमिक व उच्च माध्यमिकचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिलेले आहे. विदर्भामध्ये उन्हाचा तडाका जास्त असल्याने त्याचप्रमाणे तापमान देखील जास्त असल्याने उन्हाळी सुट्टी राज्य मंडळाच्या सर्व शाळा ते 30 जूनपासून सुरू होणार आहेत. त्याचप्रमाणे त्यावेळी रविवारी येत असल्याने 1 जुलैपासून विदर्भातील सगळ्या शाळा सुरू होणार आहेत. असे देखील सांगितलेले आहे.
पाचवी ते आठवीची फेरपरीक्षा 15 जूनपूर्वी | Summer Vacation Of School
इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यावर्षीपासून शालेय परीक्षा उत्तीर्ण करण्याचे बंधन आहे. त्यांच्या परीक्षा नुकत्याच पार पडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा निकाल हा नेहमीप्रमाणे 1 मेपर्यंत जाहीर होणार आहे. त्यात पाचवी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी जे नापास होतील त्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. ही परीक्षा साधारण 10 जूनपूर्वी घेतली जाईल. या परीक्षेत मात्र विद्यार्थ्यांना पास व्हावे लागेल. अन्यथा त्यांना त्याच वर्गात बसावे लागणार आहे.
आरटीईच्या प्रवेश अर्जासाठी 30 मे पर्यंत मुदत
आरटीई प्रवेशासाठी पालकांना त्यांच्या मुलांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ही 30 मेपर्यंत आहे. त्यामुळे या मुदतीतच अर्ज करणे खूप गरजेचे आहे. यावर्षी मुदत वाढ केली जाणार नाही. असे देखील सांगितलेले आहे. प्रवेश अर्ज करताना त्यांच्या घरापासून एक किलोमीटरवर असणारा शाळेचा पर्याय निवडणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांचा अर्ज बाद होऊ शकतो. असे देखील शालेय शिक्षण मंडळाने स्पष्ट केलेले आहे.