औरंगाबाद – जगप्रसिद्ध वेरूळ येथील चैत्यगृह लेणी क्रमांक 10 पाषाणी मुर्ती ठराविक दिवशी सुवर्णप्रकाशाने उजळुन निघते तेव्हा सुर्यालाही तेज यावे मुर्ती अशी ही तथागथांची मुर्ती दिसते. या क्षणाचे नयनरम्य असे दृश्य युवा कलाकार तसेच छायाचित्रकार करण कोठेकर यांनी टिपले आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना करण कोठेकर यांनी सांगितले की, सायंकाळचा सुवर्णयोग झरोक्यातून घडला असा अद्वितीय राजयोग म्हणावा जसा, स्वतः सूर्य देव आपल्या किरणांनी गौतम बुद्धांना अभिषेक घालण्यासाठी या दिवसाची वाट बघत होते. तो क्षण आणि ती जागा ह्या दोन्ही गोष्टी विचार कराव्यात इतकं सोपं नाही कारण आजही माणसांना विचार करण्यास भाग पाडणाऱ्या एलोरा येथील त्या ऐतिहासिक लेण्यांमधील चैत्य लेणी नंबर 10 मधील गौतम बुद्धांच्या प्रकृतीचा एक अद्वितीय राजयोग असा घडावा खरच डोळे दिपवणारा हा क्षण जेव्हा एका छोट्याशा झरोक्यातून अंधारातील पाशानी मुर्तीला सुर्यदेव आपल्या प्रकाशाने सुवर्ण रुप आणतात तेव्हा तो क्षण तेजोमय दिव्यत्वाची प्रचिती देणारा असतो.
दरवर्षी 10 ते 13 मार्च, सायंकाळी 4 ते 5:30 यादरम्यान सूर्याची किरणं लेणीच्या झरोक्यातून आत शिरतात आणि स्तुपा समोरील सिंहासनावर तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीवर जाऊन अभिषेक घालतात. हा ताळमेळ असा जोडून येतो की सूर्याचे तेज बुद्धीच्या तेजावर जाऊन पडतात सूर्याची किरणे आपल्या तेजाने त्या तथागतांचा पायापासून तर मस्तकापर्यंत एका स्पॉट लाईट प्रमाणे त्या मूर्तीचे प्रत्येक पैलू आपल्याला पहावयास मिळते. हे दैवी दृश्य पाहताना मी नतमस्तक झालो त्यां कलाकारांच्या अविश्वसनीय कलाकृती समोर ज्यांनी हे घडवून आणले, असे छायाचित्रकार करण कोठेकर यांनी सांगितले.