मोठी बातमी!! सुनेत्रा पवार थेट मोदीबागेत; शरद पवारांची भेट घेतली??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाचे संकेत मिळत आहेत. काल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आज अजित पवारांच्या पत्नी आणि दादा गटाच्या खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या मोदीबागेत दाखल झाल्या. महत्वाची बाब म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) सुद्धा आज सुप्रिया सुळे यांच्यासह मोदीबागेत आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा खासदार करण्यात आलं. यानंतर प्रथमच आज सुनेत्रा पवारांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु आहे. हि भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र छगन भुजबळ यांच्यानंतर सुनेत्रा पवार या शरद पवारांच्या भेटीला गेल्यानंतर राज्याचे राजकारण पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भोवती फिरत आहे.

सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये दाखल झाल्या तेव्हा शरद पवार, सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होते. सुनेत्रा पवार साधारणपणे एक तास मोदीबागेत होत्या. एका तासानंतर त्या मोदी बागेमधून बाहेर पडल्या आहेत. मात्र या काळात सुनेत्रा पवार या शरद पवार सुप्रिया सुळे यांना भेटल्या का⁠ याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान सुनेत्रा पवार अजित पवारांच्या बहिणीला भेटण्यासाठी आल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु या सर्व घटनाक्रमात शरद पवार हे मात्र केंद्रस्थानी दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप पाहायला मिळणार का? या चर्चाना उधाण आले आहे.