सुनील देवधरांना दोन पदांची लॉटरी

Thumbnail 1533107954505
Thumbnail 1533107954505
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून पूर्वेकडील राज्यात मोठी कामगिरी केलेले सुनील देवधर यांची भाजप च्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना आंध्र प्रदेशाचे सहप्रभारी म्हणून ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्रिपुरा राज्यात भाजपचा एकही आमदार नसताना त्याराज्यात भाजपची सत्ता आणण्याचा दिव्य पराक्रम सुनील देवधर यांनी करून दाखवला होता. याच कार्याची दखल घेऊन भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांना ही नवी जबाबदारी बहाल केली आहे.

आंध्र प्रदेशाच्या सहप्रभारी पदी नेमणूक होताच त्यांनी नवीन घोष वाक्य जाहीर केले आहे. “माणिक गए, अब बाबू की बारी है।” आशा घोषणेनिशी त्यांनी आंध्र प्रदेशात जाण्याची तयारी केली आहे. भाजपचा मित्र पक्ष असणाऱ्या तेलगू देशम पक्षाने भाजपा पासून फारकत घेतली आहे. तसेच लोकसभेत मोदी सरकार वर अविश्वास प्रस्ताव ही याच पक्षाने आणला होता. त्याचा पुरेपूर बदला घेण्यासाठी भाजप सज्ज झाला असून आगामी विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबूला सत्तेतून पाय उतार होण्यासाठी भाग पाडणार असल्याची भाजपची हालचाल दिसत आहे.

भाजपचे रणनीतीकार म्हणून ओळख असलेले अमित शहा यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून सुनील देवधर गणले जातात. सुनील देवधर मूळचे कोकणातील असून पुणे आणि मुंबईत त्यांचा बरीच वर्षे सहवास होता.