Sunday, March 26, 2023

वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच भारताचा कर्णधार असावा; गावस्करांची रोहितसाठी जोरदार बॅटिंग

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा हाच विश्वचषक स्पर्धेत भारताचा कर्णधार असावा असे रोखठोक मत माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केल आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषकातच रोहित शर्माला कर्णधार करावे तसेच, पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी देखील रोहितनेच नेतृत्व करावे, असे देखील गावस्कर म्हणाले.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावस्कर म्हणाले, “मला वाटतं की, पुढील दोन विश्वचषकांसाठी रोहित कर्णधार असावा कारण तो सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. एक विश्वचषक पुढील महिन्यात आहे तर दुसरा एक वर्षानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे या क्षणी तुम्ही जास्त कर्णधार बदलू इच्छित नाही, पण रोहित शर्मा दोन्ही टी-२० विश्वचषकासाठी माझी निवड असेल.

- Advertisement -

गावस्कर यांनी केवळ टीम इंडियाचा कर्णधार कोण असावा सांगितलं नाही तर उपकर्णधार कोण असावं हे सांगितलं आहे. के एल राहूल हा टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून पाहायला आवडेल. याशिवाय रिषभ पंतने ज्या प्रकारे दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केले आहे ते कौतुकास्पद आहे. त्याला उपकर्णधार म्हणून पाहायला आवडेल, असं सुनील गावस्कर म्हणाले