बेजबाबदार फटका मारायची गरज काय होती? ; सुनील गावस्कर रोहित शर्मावर भडकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात अनुभवी फलंदाज रोहित शर्माने खराब शॉट खेळून आपली विकेट बहाल केली. संयमी खेळी करण्याची गरज असताना रोहित शर्मा क्रीजमधून पुढे आला आणि त्याने हवाई फटका खेळला. लायनने सीमारेषेवर लावलेल्या फिल्डरने रोहितचा सहज झेल पकडत त्याला तंबूत धाडले. अनुभवी रोहित शर्मा बेजबाबदार फटका मारुन बाद झाल्यानंर त्याच्या टीकेची झोड उडाली आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार फलंदाज सुनील गावसकर यांनीही रोहित शर्मावर नाराजी व्यक्त केली आहे.

रोहितवर गावसकरांनी आपल्या खास शैलीत नाराजी व्यक्त केली. गावसकर म्हणाले, ‘का? काय गरज होती? असा बेजबाबदार फटका मारायची गरज काय होती? लॉन्ग ऑन आणि डीप स्कवायर क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चौकारानंतर लगेच मोठा फटका मारण्याची गरज होती का? सर्वात अनुभवी फलंदाज असताना असा फटका मारण्याची गरज नव्हती. आता कोणतेही कारण देऊन उपयोग नाही. गरज नसताना रोहितनं आपली विकेट टाकली. कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्या सुरुवातीनंतर शतकात रुपांतर करावं लागतं. प्रतिस्पर्धी संघानी धावसंख्या ३६९ आहे, हे लक्षात ठेवायची गरज होती. अस गावस्कर म्हणाले.

आज चांगल्या मूड मध्ये दिसलेल्या रोहित शर्माने ७४ चेंडूंमध्ये ४४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने ६ चौकार लगावले. पण अतिशय खराब फटका खेळत तो बाद झाला. तिसऱ्या कसोटीतदेखील रोहित अर्धशतक पूर्ण करताच बेजबाबदार फटका खेळला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment