हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेचे वारसदार आम्हीच आहोत, असा दिंडोरा पिटणाऱ्या काही मंडळींकडून लोकसभेच्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रचारसभांमधून अजित पवारांबाबत क्लेषकारक विधान केली गेली असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवारांवर नाव न घेता टीका केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मुंबईत वर्धापनदिन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना सुनील तटकरे यानी अनेक विषयांवरून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला.
आपल्या भाषणात सुनील तटकरे म्हणाले, भुजबळ यांना जर मुख्यमंत्री केलं असत तर पक्ष फुटला असता असं सांगितल गेलं. नेतृत्वाने ही भुमिका घेतली होती. सर्वात जास्त मत त्यावेळी भुजबळ यांना पडली होती. आम्हाला त्यावेळी मुख्यमंत्रिपद घ्यायचं नव्हतं, मात्र प्रफुल भाई तुम्हाला ही घ्यायचं नव्हतं असा समज होता. दादा तुम्ही राज्यमंत्री असताना तुमची माझी भेट झाली. त्यावेळी मला जाणवल की वेगळं रसायण आहे. पवार साहेब ही 72 व्या वर्षी केंद्रात मंत्री झाले. त्यावेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदाची संधी आली होती ती जर घेतली असती तर पक्षाला मागे वळून बघायची गरज वाटली नसती. तुम्हाला 7 वर्षांचा तरी तुम्ही मुख्यमंत्री झालात, मग अजितदादांनाही 7 वर्षांचा अनुभव असताना त्यांना मुख्यमंत्रिपद का नाकारलं? असा सवाल तटकरे यांनी केला.
तटकरे पुढे म्हणाले, मला एका गोष्टीचं शल्य जरूर आहे की, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेचे वारसदार आम्हीच आहोत, असा दिंडोरा पिटणाऱ्या काही मंडळींकडून लोकसभेच्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रचारसभांमधून अजित पवारांबाबत क्लेषकारक विधान केली गेली. टीका टिप्पणी व्हावी ती धोरणांवर व्हावी, पण अरेतुरे करत होऊ नये, असं म्हणत तटकरे यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली. तसेच लोकसभेतील पराभव हा एकट्या अजित पवारांचा पराभव नाही तर राष्ट्रवादीच्या सर्वांचाच पराभव आहे असेही तटकरे यांनी म्हंटल.