सनी लिओनीचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल

0
362
Sunny Lioni
Sunny Lioni
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | सनी लिओनी सध्या तिच्या करनजीत कौर या वेबसिरिजच्या दुसर्या सिझनच्या प्रमोशनमधे बिझी आहे. सनी अलीकडे चित्रपटांपेक्षा सोशल मिडीयावर अधिक अॅक्टीव्ह असते. सनी ने अलीकडेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला जो काही वेळातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. सदर व्हिडीओ मुंबई विमानतळावरील असून त्यात सनी ‘बोलो तारा रारा..’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

सनीचा हा व्हिडीओ आत्तापर्यंत २५ लाख लोकांनी पाहीला आहे. मुंबई विमानतळावरील जेट ब्रिजवर शुट केलेल्या या व्हिडीओत सनी तिच्या टीमसोबत भन्नाट भांगडा करताना दिसत आहे. “मी आणि माझी टीम कुठलाही वेडेपणा करु शकतो” असे कॅप्शन सनीने वापरले आहे.

सनी लिओनीच्या खर्या आयुष्यावर आधारीत असलेल्या ‘करनजीत कौर – द अनटोल्ड स्टोरी’ या वेबसिरिजचा पहिला सिझन सुपरहीट झाल्यानंतर आता येत्या १८ सप्टेंबर पासून दुसरा सिझन रिलीझ होत आहे. वेबसिरिजच्या प्रमोशन चा भाग म्हणूनच सनीने हा व्हिडीओ अपलोड केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here