सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा पोलिसांनी अवघ्या दीड महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणावर धाडी टाकून तब्बल 12 रिव्हॉल्व्हर जप्त केल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रिव्हॉल्व्हर सापडत असल्याने सातारा जिल्ह्याचा बिहार झाला आहे की काय? असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी आता रिव्हॉल्व्हर शोधण्याची धडक मोहीम सुरू केली असल्याची माहिती दिली आहे.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या 1 ते 2 महिन्यापासून पोलिसांनी रिव्हॉल्व्हर शोध मोहिम सुरु केली असून या काळात 12 रिव्हॉल्व्हर जप्त केल्या आहेत. यामध्ये पोलीस खात्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काही लोकांकडून बेकायदेशीर शस्त्रांचा वापर केला जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी एकत्रित यावर चर्चा केली. तसेच वेगळी पथके तयार केली. आणि त्यांना त्याप्रमाणे योग्य त्या सूचना दिल्या. त्यानुसार रिव्हॉल्व्हर जप्त करण्याच्या कारवाया सुरु करण्यात आल्या आहेत.
— santosh gurav (@santosh29590931) January 2, 2023
आम्हाला रविवारी एका घटनेत चार रिव्हॉल्व्हर सापडल्या. आम्ही हि कारवाई सुमोटो पद्धतीने करत आहोत. कोणतीही घटना होण्यापूर्वी आम्ही बेकायदेशीरपणे रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या लोकांवर कारवाई करत त्याच्याकडून ती जप्त करत आहोत. आणि संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करीन सातारा शहरात शँत्तामय वातावरण राहावे म्हणून प्रयत्न करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.