सातारा | नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले आहेत. महाबळेश्वर येथील पोलिस ठाण्यात बाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक बन्सल यांनी पोलिस ठाण्यास भेट देऊन दिली.
या वेळी पोलिस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी उपस्थित होते. पोलिस ठाण्याची भेट झाल्यानंतर अजयकुमार बन्सल यांनी महाबळेश्वर शहरातून फेरफटका मारून लॉकडाउनच्या नियमांचे नागरिक पालन करतात का, याची माहिती घेतली. त्यांनी पोलिस ठाणे ते सुभाष चौक असा फेरफटका मारला. या वेळी काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती.
यावेळी दुकानदारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत नियमांचे पालन करण्याचे आवाहनही पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल केले. अधीक्षक बन्सल म्हणाले, “ब्रेक द चेनसाठी लॉकडाउन लागू केला, तरी कोरोना नियंत्रणात येत नाही. त्यामुळे कडक लॉकडाउन करावा लागेल. शहरात लॉकडाउनचे नियमांचे पालन चांगल्या प्रकारे केले जात आहे. पर्यटकांची आवकही मंदावली आहे; परंतु नागरिकांनी लस घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.”