हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाने कहर केला आहे. त्याचा वाढत संसर्ग थांबविण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लास उपलब्ध झाली आहे. हि लास प्रत्येकाने टोचून घ्यायची आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेविरूद्ध लढाई जिंकण्यासाठी देशात सुरु असलेली हि लसीकरण मोहीम जोरदार सुरु आहे. चित्रपट आणि टीव्ही सेलिब्रिटींनी व्हॅक्सिन घेतानाचे स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांनाही लस घेण्यास आवाहन करीत आहेत. नुकतेच थालयव रजनीकांत यांनीही व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांची लेक सौदर्याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
Our Thalaivar gets his vaccine 👍🏻 Let us fight and win this war against Corona virus together #ThalaivarVaccinated #TogetherWeCan #MaskOn #StayHomeStaySafe pic.twitter.com/P8Gyca4zdF
— soundarya rajnikanth (@soundaryaarajni) May 13, 2021
सध्या संपूर्ण देश कोरोना विरोधात लढतो आहे. याकरिता कोरोनो प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरु आहे. हि लास प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. नुकतेच जगभरातून तमाम चाहते असणारे सुपरस्टार रजनीकांत यांनी व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांची मुलगी सौंदर्या हिने ट्विटरवरुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे. रजनीकांत यांचा व्हॅक्सिन घेतानाचा फोटो तिने पोस्ट केला आहे. आपल्या थलायवाने व्हॅक्सिन घेतले आहे. आपण एकत्र मिळून कोरोना व्हायरस विरोधात लढूया अशा आशयाचे कॅप्शन तिने या फोटोसोबत दिले आहे. यासोबत घरात रहा, मास्क लावा असे आवाहनही तिने लोकांना केले. सौंदर्याचे हे ट्विट अगदी क्षणातच व्हायरल झाले आहे.
https://www.instagram.com/p/Bf0rrl8jUfy/?utm_source=ig_web_copy_link
दाक्षिणात्य सिने सृष्टीत देवासारखे पुजले जाणारे रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगळुरुतील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचा प्रवास जितका खडतर तितकाच अद्भूत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्याइतकी लोकप्रियता आजतागायत कुणालाच प्राप्त झालेली नाही. आजही रजनीकांत यांचा चित्रपट प्रदर्शित झाला की, चाहते पहाटे पासून थिएटर बाहेर रांगा लावतात. रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या स्वागतासाठी वाजत गाजत मिरवणुका निघतात. दक्षिण भारतात रजनीकांत यांची प्रतिमा एखाद्या ‘देवासमान’ किंवा सुपरमॅनसारखी आहे. त्यामुळे त्यांचे अनुकरण लाखो चाहते करुन व्हॅक्सिन नक्कीच घेतील अशी आशा आपण ठेवूच शकतो.