कराड प्रतिनधी| विशाल वामनराव पाटील
सुपने येथे डॉ. ऐश्वर्या शशिकांत शिंदे, पै. कु. अमृता सुरेश चौगुले यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामपंचायतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात सरपंच विश्रांती पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच अजित जाधव, माजी अध्यक्ष महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन सातारा प्रवीण पाटील, बलराज पाटील, संस्थापक अध्यक्ष माध्यमिक शिक्षक बँक मुंबई जे. आर. पाटील, अजित पाटील, अमृत पाटील, विनोद पाटील, मीना शशिकांत शिंदे, श्रीमती रत्नाबाई नामदेव शिंदे, शशिकांत शिंदे, प्रा. उदयकुमार पाटील, पै. सुरेश चौगुले, राहुल हुलवान, माजी सरपंच पै. सतीश पानुगडे, वस्ताद पै. प्रशांत पाटील, पै. दिग्विजय जाधव आदी उपस्थित होते.
सुपने गावची कन्या असलेल्या डाॅ. ऐश्वर्या शिंदे हिने शरदचंद्रजी पवार होमिअोपॅथिक मेडिकल काॅलेज श्रीरामपूर येथे वैद्यकीय पदवीधर परिक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. होमिअोपॅथिक मटेरिया मेडिका विषयात सुवर्ण पदकासह प्रथम क्रमांक डाॅ. शिंदे हिने मिळवला. तर सुपनेची शिवछत्रपती कुस्ती केंद्राची कुस्तीपटू पै. अमृता चाैगुले हिने भोपाळ, मध्यप्रदेश येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मध्ये 63 किलोवजन गटात रजत पदक मिळवले आहे.