हिंदू पक्षाला मोठा झटका!! मथुरेतील शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज सर्वोच्च न्यायालयाने मधुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणांमध्ये हिंदू पक्षाला एक मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देत अलाहाबाद हाय कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यापूर्वी हायकोर्टाने शाही ईदगाहचा सर्वे करण्यासाठी कमिश्नर नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. या विरोधात मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने या सर्वेक्षणाला स्थगिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले की, “या प्रकरणाचे हायकोर्टात सुनावणी सुरू राहणार आहे. परंतु सर्वे करण्यासाठी कमिश्नर नियुक्त करण्याच्या हाय कोर्टाच्या आदेशावर अंतरिम स्थगिती राहिलं” तसेच हिंदू पक्षाला न्यायालयाने सांगितले की, तुमचा अर्ज स्पष्ट नाही, त्यामुळे तुम्हाला नेमके काय हवे हे सांगावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षांच्या बाजूने दिलेल्या या निकालामुळे हिंदू पक्षाला मोठा झटका बसला आहे.

दरम्यान, श्रीकृष्ण जन्मभूमी वाद प्रकरणांमध्ये शाही ईदगाहच्या सर्वेच्या मागणीसाठी 7 जणांनी अलाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये अपीलकर्त्यांनी ASI सर्वेची मागणी केली होती. तसेच, भगवान श्रीकृष्ण यांचे जन्मस्थान मशिदीच्या खाली आहे, असा देखील दावा केला होता. त्यामुळे या मशिदीचा सर्वे करण्यात यावा, असे याचिकेत म्हटले गेले होते. त्यामुळेच हायकोर्टाने सर्वे करण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यामुळे हायकोर्टाच्या या निर्णयाला विरोध करत मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाच्या बाजूने निकाल दिला आहे.